निवडणूक आयोगाची घोषणा, पण याद्यांचा घोळ कायम! पत्रकारांच्या प्रश्नांवर आयोगाची भंबेरी

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ५ नोव्हेंबर २०२५ | राज्य निवडणूक आयोगानं अखेर २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली. मात्र, विरोधकांनी सतत उपस्थित केलेल्या दुबार आणि बोगस मतदारांच्या प्रश्नावर आयोगाकडे ठोस उत्तर नव्हतं, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.

पत्रकार परिषदेत आयोगानं सांगितलं की, ‘दुबार मतदारांवर डबल स्टारचा फॉर्म्युला’ लागू करण्यात येईल. पण नेमका हा फॉर्म्युला काय आहे, याबाबत आयोगाचे अधिकारी गोंधळलेलेच दिसले.

⚙️ काय आहे हा ‘डबल स्टार’ फॉर्म्युला?
संबंधित मतदार कुठे मतदान करतो, याची माहिती अधिकारी गोळा करणार
मतदाराचं नाव, लिंग, फोटो, पत्ता सर्व तपासले जाणार
जर नाव दोन ठिकाणी असेल, तर मतदाराच्या इच्छेनुसार फक्त एकाच ठिकाणी मतदान करता येणार
मतदान केंद्रावर “इतरत्र मतदान केलेले नाही” असं प्रतिज्ञापत्र घेतलं जाणार

💥 पत्रकारांचा प्रश्न, आयोगाची भंबेरी!
पत्रकारांनी विचारलं — “शौचालयात नोंदवलेला मतदार कोणत्या वॉर्डचा?”
या प्रश्नानं आयोगाच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. काही काळ सभागृहात संपूर्ण शांतता पसरली. शेवटी अधिकाऱ्यांनी उत्तर देण्याचं टाळलं.

🗯️ विरोधकांचा संताप — “दुबार मतदार मान्य करून निवडणूक?”
गेल्या काही दिवसांपासून विरोधक दुबार आणि बोगस मतदारांच्या मुद्द्यावर आक्रमक आहेत. त्यांनी “याद्या स्वच्छ झाल्याशिवाय निवडणुकीची घोषणा करू नका” अशी मागणी केली होती.सत्याचा मोर्चा काढून, केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतरही आयोगानं आज निवडणुका जाहीर केल्या.

विरोधक म्हणतात —
“आयोगाला दुबार मतदार असल्याचं मान्यच आहे, म्हणून तर दोन स्टारचा फॉर्म्युला आणलाय. मग याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका का?”

🔍 थोडक्यात:
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर
दुबार मतदार रोखण्यासाठी ‘डबल स्टार’चा फॉर्म्युला
पत्रकारांच्या प्रश्नांवर आयोग गप्प
विरोधक म्हणतात – “हा उपाय नव्हे, लाज झाकण्याचा प्रयत्न!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *