महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. १० सप्टेंबर – बेरोजगारीसंदर्भात देशाच्या विविध भागातून सूर उमटतो आहे. बुधवारी याच विषयाला धरून रात्री 9 वाजता 9 मिनिटं हा ट्रेंड चालवण्यात आला.या मोहिमेला अनेक विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला. यानुसार आपापल्या घरी वीजपुरवठा बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.
सोशल मीडियावर, ट्वीटरवर 9 वाजता 9 मिनिटं ट्रेंड होऊ लागलं. देशातल्या असंख्य तरुणांनी तसंच अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यासंदर्भात ट्वीट करायला सुरुवात केली. यामुळे हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. कंगना राणावत प्रकरण बाजूला पडून सोशल मीडियावर हा विषय चर्चेत आला.लोकांनी हातात मेणबत्ती घेतल्याचे फोटो शेअर केले. बुधवारी रात्री 11 वाजेपर्यंत या हॅशटॅगसह दहा लाखाहून अधिक ट्वीट करण्यात आले होते.
#WATCH बिहार : बेरोजगारी के विरोध में प्रदर्शन करते हुए राजद नेता तेजस्वी यादव, तेज प्रताप यादव और राबड़ी देवी ने लालटेन जलाई।
RJD नेता तेजस्वी यादव ने कहा, "सबसे ज्यादा युवाओं की आबादी बिहार में है लेकिन हकीकत में बिहार बेरोजगारी का केंद्र बन चुका है।" pic.twitter.com/Zu23YxdXM2
— ANI_HindiNews (@AHindinews) September 9, 2020
बिहार बेरोजगारीचं केंद्रबिंदू झाला आहे अशी टीका तेजस्वी यांनी केली. सोशल मीडियावर लोक फोटो आणि पोस्टच्या बरोबरीने हा हॅशटॅग वापरताना दिसले.
