![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ९ डिसेंबर २०२५ |
मेष -आपली रास कोणत्याही काम घेते पण काही वेळेला अर्धवट राहण्याची सवय असते. उतावळेपण असते. आज हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. उष्णतेच्या तक्रारी वगळता आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
वृषभ – कामाचे एकूण ताण आणि दगदग आज जाणवण्याचा दिवस आहे. म्हणूनच प्रवास टाळणे गरजेचे आहे. पैशाला विविध वाटा फुटतील. मनोबलही कमी राहील. काळजी घ्यावी.
मिथुन – महत्त्वाचे पत्रव्यवहार आज पार पडणार आहेत. अनेकांच्या सहकार्याने पुढे जाल. विविध लाभ मिळण्याचा आजचा दिवस आहे. विशेषतः परदेशी वार्तालाप होतील.
कर्क – तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभणार आहे. केलेल्या कामाचे योग्य ते कौतुक झाल्यामुळे मनोबल आणि आत्मविश्वास वाढता राहील.
सिंह – काही गोष्टी न ठरवता होतात तसा आजचा दिवस आहे. विशेष गुरुकृपा आपल्याला लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता कानी येईल. आपण फक्त निमित्त मात्र असतो हे आज जाणून येईल.
कन्या – नकटीच्या लग्नाला असा काहीसा दिवस आहे. म्हणून सतराशे साठ विघ्न येतीलच. केलेल्या कामात अडथळे आहेत. वाहने जपून चालवा. खर्चालाही धरबंद राहणार नाही.
तूळ – वैश्य प्रवृत्तीची आपली रास आहे.भागीदारी व्यवसायामध्ये सुयश लाभेल. इतरांवर तुमचा प्रभाव राहील. संसारीक गोष्टींमध्ये सुद्धा विशेष रस तुम्हाला आज निर्माण होईल. दिवस चांगला आहे .
वृश्चिक – केलेल्या कामाचं जणू काही “पालथ्या घरावर पाणी” असा दिवस आहे. वेळा आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मनोरंजनाकडे कल असू शकेल. अनाकलनीय आजार जाणवतील.
धनु – संतती सौख्याला दिवस चांगला आहे. धनासाठी आपली रास खरच लाभदायी आहे. आज आर्थिक क्षेत्रात एखादं धाडस करायला हरकत नाही. प्रेम प्रणयामध्ये सुद्धा यश दिसते आहे.
मकर – चिकट आणि चिवट असणारी आपली रास. पुढील गोष्टींचे नियोजनही उत्तम असते. आज तुम्ही घेतलेल्या निर्णय आणि अंदाज अचूक ठरणार आहेत. मानसिक स्वास्थ, समाधान लाभणारा आजचा दिवस आहे.
कुंभ – न बोलता अविरत काम करणं हि आपल्या राशीची खासियत आहे. आज विशेषत्वाने तुमची जिद्द आणि चिकाटी वाढेल. नोकरीमध्ये सुद्धा समाधानकारक स्थिती राहील. काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अंगावर येतील.
मीन – अचानक धनलाभ होईल. व्यवसायामध्ये नवीन तंत्र आणि मंत्र आज तुम्ही अवलंबू शकाल. कामाच्या ठिकाणी अडथळे आले तरीसुद्धा ते पार पडतील. कुटुंबीयांचे योग्य ते सहकार्य आज लाभेल.