✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ३ डिसेंबर २०२५ | युरोपकडून वाढत्या टीकांच्या गदारोळात पुतिन यांनी आता थेट, निर्वाणीचा इशाराच दिला आहे. त्यांचा सूर नेहमीसारखा थंड, पण शब्द धारदार—“युरोपला युद्ध हवं असेल, तर आम्ही तयार आहोत… आणि जे करु ते असा शेवट करु की चर्चेला बसायला कुणी उरणार नाही!” एवढं बोलून रशियन राष्ट्राध्यक्षांनी युरोपच्या राजकारणात अक्षरशः भूकंप घडवून आणला.
युक्रेन युद्धाला चार वर्षे उलटताना, युरोप म्हणतं—आज युक्रेन, उद्या NATO? पण पुतिन म्हणतात—“हे सर्व दावे हास्यास्पद! आम्ही युक्रेनमध्ये ‘मर्यादित कारवाई’ करत आहोत… पण युरोप जर सीमा ओलांडेल, तर आम्हीही संकोच ठेवणार नाही.” जर्मनीच्या गुप्तचरांनी वाजवलेल्या २०२९ च्या NATO-रशिया युद्धाच्या इशाऱ्याने तापलेल्या वातावरणात पुतिनची ही वक्तव्यं म्हणजे राजनैतिक रणांगणात उडालेली मोठी ठिणगीच.
युरोप एका बाजूला सावध… तर पुतिन दुसऱ्या बाजूला तयार. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या या पटावर आता पुढची चाल कोण टाकणार—हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
युरोप-रशिया तणावात आता जागतिक राजकारणातली एक मोठी भीती पुन्हा डोकं वर काढतेय— पुतिन यांच्या एका वाक्याने संपूर्ण युरोपचा नाडी स्पंदन वाढवण्यासाठी पुरेसं ठरलं आहे. कारण आत्तापर्यंत रशियाने युक्रेनमध्ये वापरलेली रणनीती तुलनेने मर्यादित होती, पण पुतिन यांनी पहिल्यांदाच खुलेपणाने संकेत दिले की “मर्यादा” पुरत्या तुटू शकतात. युक्रेनमधील युद्ध जरी लांबत असलं तरी रशियाची सैनिकी क्षमता, शस्त्रसाठा आणि नवीन तंत्रज्ञान युरोपला घाम फोडण्यासाठी पुरेसं आहे. युरोपिय महासंघ आधीच ऊर्जा-अभाव, शस्त्रपुरवठा आणि आर्थिक दबावाखाली आहे. अशातच पुतिन यांचा संदेश म्हणजे— कोणी काय करायचं ते करा, पण युद्धाच्या टेबलावर बसलात तर पहिल्या फटक्यात आम्ही तुम्हाला ‘शांत’ करू, अशी उघड धमकीचं गजरासारखी युरोपभर घुमली आहे.
