![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ३ डिसेंबर २०२५ | लाखो लोक रोजच्या व्यवहारासाठी क्रेडिट कार्डचा वापर करतात. खरेदी करताना कार्डवर एक निश्चित क्रेडिट लिमिट असते. ही लिमिट ओलांडली की बँका अतिरिक्त दंड आकारत असत. यामुळे ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने (RBI) क्रेडिट कार्डधारकांसाठी महत्त्वाचा व दिलासादायक निर्णय घेतला आहे.
🔹 ‘ओवरलिमिट’ फीचर आता ऑटोमॅटिक सुरू होणार नाही
नवीन नियमांनुसार—
बँकांना आता ग्राहकांच्या संमतीशिवाय Overlimit Feature सक्रिय करता येणार नाही.
पूर्वी अनेक बँका हे फीचर आपोआप सुरू करायच्या, ज्यामुळे ग्राहक अनवधानाने लिमिटपेक्षा जास्त खर्च करायचे आणि त्यानंतर दंड बसायचा.
RBI ने आता ही सुविधा पूर्णपणे थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
🔹 ग्राहकांना मिळणार पूर्ण नियंत्रण
आता ग्राहक स्वतः—
मोबाईल अॅप
इंटरनेट बँकिंग
बँकेच्या कंट्रोल पॅनेल
या माध्यमातून Overlimit Feature सुरू किंवा बंद करू शकतील.
ज्यांचे खर्च कधी कधी चुकून लिमिटच्या वर जातात, त्यांच्यासाठी ही सुविधा अधिक सुरक्षित ठरणार आहे.
🔹 तुमच्या कार्डवर Overlimit Feature सुरू आहे का? असे करा तपास
तुमच्या बँकेचे मोबाईल अॅप किंवा क्रेडिट कार्ड पोर्टल उघडा.
‘Card Manage’ किंवा ‘Manage Card Settings’ या विभागात जा.
तिथे तुम्हाला Overlimit / Limit Control असा पर्याय दिसेल.
त्यावर क्लिक करून फीचर Active आहे की Inactive हे सहज तपासता येईल.
