✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ३ डिसेंबर २०२५ | अमेरिकेतील भारतीय वंशाचे पहिले न्यूयॉर्क महापौर जोहरान ममदानी यांनी आपल्या भारतीय ओळखीबद्दल आणि स्थलांतरितांच्या प्रश्नांवर प्रभावी भूमिका मांडली आहे. हिंदुस्थानी वृत्तपत्राला दिलेल्या पहिल्या मुलाखतीत त्यांनी भारतीय संस्कृती, स्थलांतरितांचे हक्क आणि अमेरिकेतील कठोर तपासणी कारवाई यावर स्पष्टपणे मत व्यक्त केले.
🔹 “भारत माझ्या हृदयाजवळ आहे”
ममदानी म्हणाले,“माझी सुरुवात भारतातून झाली आहे. युगांडामधील वास्तव्य आणि त्यानंतर अमेरिकेत आगमन—या सर्व प्रवासात भारतीय संस्कृती माझ्याबरोबर राहिली. माझी पहिली ओळख भारतीय असल्याचा मला अभिमान आहे.”ते पुढे म्हणाले की, त्यांच्या पालकांनी इतर स्थलांतरितांप्रमाणे अमेरिकेच्या प्रगतीत योगदान दिले असून, आजही लाखो कुशल स्थलांतरितांना एच-1बी व्हिसा मिळण्यात अडचणी येत आहेत.
🔹 आयसीईच्या कारवायांवर कडक नाराजी
अमेरिकेतील काही भागांमध्ये स्थलांतरितांवर वाढलेली तपासणी आणि कारवाई याबद्दलही त्यांनी ठाम भूमिका घेतली.न्यूयॉर्कमध्ये आयसीईच्या नावाखाली होणारी अटक व छापे वाढले आहेत.
यावर ममदानी म्हणाले,
“अमेरिकेतील कायदा मोडण्याचा अधिकार ना एजंटना आहे, ना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना. बेकायदेशीर कारवाई न्यूयॉर्कमध्ये सहन केली जाणार नाही.”
त्यांनी स्पष्ट केले की न्यूयॉर्क पोलीस आयसीईच्या छाप्यांमध्ये सहभागी होणार नाहीत, आणि स्थलांतरितांना त्रास दिला जाऊ नये यासाठी प्रशासन ठाम उभे राहील.
🔹 भारतीय वारसा दिला वेगळा दृष्टीकोन
ममदानी यांच्या म्हणण्यानुसार,“भारतीय वारशाने मला सांस्कृतिक विविधता, लोकशाही, राजकीय सत्ता आणि स्थलांतर या विषयांकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहायला शिकवले आहे.”याच वारशामुळे न्यूयॉर्कसारख्या बहुसांस्कृतिक शहरात ते अधिक संवेदनशील आणि जनतेशी जवळीक साधणारी निती राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
🔹 “महापौर म्हणून माझे कार्यच माझी ओळख ठरेल”
न्यूयॉर्कचा पहिला भारतवंशीय महापौर असणे अभिमानाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले.मात्र ते पुढे म्हणाले,“पद मिळणे हा केवळ पहिला टप्पा आहे. पुढील कामगिरीतून माझी निवड योग्य का होती, हे मी सिद्ध करेन.”
