स्वस्तात मस्त ! येतोय iPhone 17E – आयफोन प्रेमींसाठी मोठी खुशखबर

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ७ डिसेंबर २०२५ | ऍपल कंपनी नव्या वर्षात भारतीय ग्राहकांसाठी एक खास सरप्राईज घेऊन येत आहे. महागडे आयफोन घेण्याचा खर्च पेलत नसलेल्या लाखो वापरकर्त्यांसाठी iPhone 17E हा नवा मॉडेल लाँच करण्याची तयारी सुरू आहे. iPhone 17 च्या तुलनेत 17E हा मॉडेल अधिक बजेट-फ्रेंडली असेल, अशी माहिती समोर आली आहे.

iPhone 17E : किंमत आणि फीचर्स काय?
किंमत: सुमारे ₹60,000 ते ₹65,000 दरम्यान असू शकते.
महागडे आयफोन घेताना जी कसरत करावी लागते, ती 17Eच्या आगमनानंतर कमी होणार आहे.

मुख्य फीचर्स :
नवीन A19 चिपसेट
गेमिंगसाठी अधिक शक्तिशाली ग्राफिक्स

एआय-पॉवर्ड फिचर्स
17 सिरीजसारखी प्रीमियम परफॉर्मन्स रेंज
यामुळे वापरकर्त्यांना कमी किमतीतही प्रीमियम आयफोनचा अनुभव घेता येणार आहे.

गुगल पिक्सेल वापरकर्त्यांसाठीही आनंदाची बातमी
ऍपलप्रमाणेच गुगलनंही आपल्या पिक्सेल वापरकर्त्यांना मोठं अपडेट देण्याची घोषणा केली आहे. Android 16 QPR2 हे नवीन अपडेट आता उपलब्ध होत आहे.

कोणत्या पिक्सेल फोनना अपडेट मिळणार?
अपडेट मिळणारी सिरीज—
Pixel 6, 6 Pro, 6a
Pixel 7, 7 Pro, 7a
Pixel 8, 8 Pro, 8a
Pixel 9, 9 Pro, 9 Pro XL, 9 Pro Fold
Pixel 10, 10 Pro, 10 Pro XL, 10 Pro Fold
Pixel Tablet, Pixel Fold

या अपडेटमुळे कॅमेरा परफॉर्मन्स, बॅटरी, सुरक्षा आणि एआय फीचर्समध्ये मोठे बदल पाहायला मिळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *