![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ११ डिसेंबर २०२५ |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
आजचा दिवस आळसात जाईल. जोडीदारासोबत पुढील गोष्टींचे नियोजन कराल. महिला थोडा हात आखडता घेऊन वागतील. वेळेचा सदुपयोग कराल. जास्त विचार करत बसू नका.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
मानसिक चिंता सतावेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. कामात जरासा सुस्तपणा जाणवेल. गोडीने सर्वांना जिंकून घ्यावे. कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
मुलांना काही नवीन गोष्टी शिकवाल; त्यांच्या सोबत वेळ घालवून मस्त वाटेल. विद्यार्थी वर्ग खुश असेल. प्रिय व्यक्ति सोबत फिरायला जाल. हाताखालील लोक चोख काम करतील.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
आईचा सहवास लाभेल. जोडीदारासोबत फिरायला जाल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. दिवस समाधानात जाईल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
काल्पनिक जगात रमून जाल. मित्रांसमोर मनातील गोष्टी बोलून दाखवाल. तरुण वर्ग आळसात दिवस घालवेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. भावंडांमधील सामंजस्य वाढीस लागेल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
एकाच वेळी अनेक कामे अंगावर घ्याल. घरातील लोकांसोबत फिरायला जाण्याचा बेत आखाल. बोलण्यात गोडवा ठेवाल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. छोटासा घरगुती कार्यक्रम होईल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
तुमच्यातील सर्जनशीलता वाढीस लागेल. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. आवडत्या कामात रस घ्याल. आवडते पुस्तक वाचनात येईल. दिवस आनंदात जाईल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
आध्यात्मिक बाबतीत रुचि वाढेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. खर्चावर नियंत्रण ठेवावे. परदेशी कंपनीत काम करणार्यांना दिवस फलदायी असेल. वैचारिक शांतता जपावी.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
आजचा दिवस आनंदी असेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. थोरांचा सल्ला मिळेल. व्यवसायिकांना चांगला लाभ होईल. जवळचे मित्र भेटतील.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
कामात अति घाई करू नका. शांततेचा मार्ग अंगिकारावा. कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळेल. आपली क्षमता सुधारण्यावर भर द्यावा. नवीन गोष्टी शिकण्याकडे अधिक प्राधान्य द्यावे.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
जुनी कामे तडीस जातील. दानधर्म करता येईल. धार्मिक कामात सहभाग नोंदवाल. कोर्टाशी संबंधित कामे पुढे सरकतील. सामाजिक स्तरावर कौतुक केले जाईल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
गूढ शास्त्रात रस घ्याल. उच्च शिक्षण घेणार्यांना फायदा होईल. पोटाच्या तक्रारी संभवतात.