१ जानेवारीपासून बदलणार डिजिटल बँकिंगचे नियम; ग्राहकांसाठी काय बदलणार?

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १० डिसेंबर २०२५ | नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून डिजिटल बँकिंग प्रणालीत मोठे बदल लागू होणार आहेत. १ जानेवारी २०२६ पासून इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि अन्य डिजिटल प्लॅटफॉर्मवर बँकांकडून दिल्या जाणाऱ्या सेवांसाठी नवीन नियम अनिवार्य होणार आहेत. डिजिटल बँकिंगमध्ये ऑनलाइन ट्रान्झॅक्शन्स, कर्ज सेवा, फंड ट्रान्सफर, बॅलन्स चेक, स्टेटमेंट डाउनलोड अशा सर्व सुविधा येतात.

नवीन नियमांनुसार, ग्राहकांना डिजिटल बँकिंगसाठी नोंदणी करताना बँकेच्या सर्व अटी व नियम “सोप्या भाषेत” समजावून देणे बंधनकारक असेल. यामध्ये खातेधारकासाठी लागू असलेल्या फी, हेल्प डेस्कची माहिती, तक्रार निवारणाची प्रक्रिया, तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मवरील सुरक्षा नियम स्पष्टपणे सांगणे आवश्यक राहील.

याशिवाय, प्रत्येक बँकेला आता ग्राहकाच्या सर्व फायनान्शियल आणि नॉन-फायनान्शियल ट्रान्झॅक्शनसाठी एसएमएस किंवा ई-मेल अलर्ट पाठवणे बंधनकारक केले आहे. म्हणजेच पैसे काढणे, जमा करणे, फंड ट्रान्सफर, पासवर्ड बदल, प्रोफाइल अपडेट, केवायसी अपडेट — अशा सर्व कृतींची माहिती ग्राहकाला त्वरित देणे आवश्यक राहील.

डिजिटल बँकिंगचा वापर वाढत असल्याने ग्राहकांचे सुरक्षितता मानदंड अधिक मजबूत करण्यासाठी हे नवीन नियम लागू करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *