Gold-Silver Price: सोन्याच्या बाजारात धक्कादायक उलथापालथ! नवा दर पाहून ग्राहक थक्क

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १० डिसेंबर २०२५ | सोन्याच्या बाजारात गेल्या काही दिवसांत प्रचंड उसळी पाहायला मिळत आहे. सातत्याने वाढणारे दर ग्राहकांच्या बजेटला अक्षरशः हादरा देत आहेत. दरवाढीच्या या त्सुनामीमध्ये आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतींमध्ये मोठा बदल नोंदवला गेला. बुधवारी देशभरातील सराफा बाजारात सोन्याचे दर वाढले असून चांदीचे भावही बदलले आहेत. त्यामुळे लग्नसराई आणि सणासुदीच्या खरेदीची योजना करणारे ग्राहक गोंधळून जात आहेत.

बुलियन मार्केटनुसार आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत १,३०,३०० रुपये झाली आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,१९,४४२ रुपये इतका झाला आहे. १ किलो चांदीची किंमत १,८७,८८० रुपये तर १० ग्रॅम चांदीचा दर १,८७९ रुपये नोंदवला गेला. कर, मेकिंग चार्जेस आणि राज्यनिहाय उत्पादन शुल्कामुळे दागिन्यांच्या किमती प्रत्येक शहरात वेगळ्या असतात.

दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांना सोन्याची खरेदी परवडणं कठीण होत असताना ज्वेलर्सचे दुकान मात्र नेहमीप्रमाणेच ग्राहकांनी गजबजलेले आहेत. बाजारातील भाव पुढे आणखी वाढणार की स्थिरावणार याकडे गुंतवणूकदारांचे आणि गृहिणींचे लक्ष लागून राहिले आहे.

तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा दर
शहर २२ कॅरेट (१० ग्रॅम) २४ कॅरेट (१० ग्रॅम)
मुंबई ₹१,१९,३४१ ₹१,३०,१९०
पुणे ₹१,१९,३४१ ₹१,३०,१९०
नागपूर ₹१,१९,३४१ ₹१,३०,१९०
नाशिक ₹१,१९,३४१ ₹१,३०,१९०

(नोट : वरील दर सूचक असून यात करांचा समावेश नाही. अचूक किमतींसाठी स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *