![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २ जानेवारी २०२६ | नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असलेल्या सोन्याच्या दरात आज पुन्हा मोठा बदल पाहायला मिळाला आहे. शुक्रवार, ०२ जानेवारी २०२६ रोजी, भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या तसेच चांदीच्या दरात लक्षणीय चढउतार झाले आहेत.
सोन्याच्या किमती गगनाला भिडल्याने सामान्य ग्राहकांच्या खिशावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. अशातच आजचे लेटेस्ट Gold-Silver Rates काय आहेत, ते सविस्तर जाणून घेऊया.
आजचे सोनं-चांदीचे दर (०२ जानेवारी २०२६)
बुलियन मार्केट वेबसाइटनुसार —
🔶 २४ कॅरेट सोनं (१० ग्रॅम) : ₹ १,३७,२१०
🔶 २२ कॅरेट सोनं (१० ग्रॅम) : ₹ १,२५,७७६
⚪ चांदी (१ किलो) : ₹ २,४३,१३०
⚪ चांदी (१० ग्रॅम) : ₹ २,४३१
उत्पादन शुल्क, राज्य कर, GST आणि मेकिंग चार्जेसमुळे सोन्या-चांदीच्या दरांमध्ये शहरानुसार फरक पडतो.
प्रमुख शहरांतील आजचा सोन्याचा भाव
शहर २२ कॅरेट (१० ग्रॅम) २४ कॅरेट (१० ग्रॅम)
मुंबई ₹ १,२५,५०१ ₹ १,३६,९१०
पुणे ₹ १,२५,५०१ ₹ १,३६,९१०
नागपूर ₹ १,२५,५०१ ₹ १,३६,९१०
नाशिक ₹ १,२५,५०१ ₹ १,३६,९१०
⚠️ टीप: वरील दर सूचक आहेत. यामध्ये GST, TCS आणि मेकिंग चार्जेस समाविष्ट नाहीत. अचूक दर जाणून घेण्यासाठी आपल्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधावा.
