आयुध निर्माणी देहूरोड येथे मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – देहूरोड | प्रतिनिधी – आरोग्यम् धनसंपदा या उक्तीला अनुसरून आयुध निर्माणी देहूरोड कार्यसमितीच्या पुढाकारातून आयुध निर्माणी देहूरोड येथील सर्व कामगार बंधू-भगिनी, स्टाफ व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर शुक्रवार, दिनांक ०२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयुध निर्माणी हॉस्पिटल परिसरात पार पडले.

हे शिबिर “निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल” यांच्या माध्यमातून यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले. उल्लेखनीय बाब म्हणजे निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल हे CGHS, ECHS तसेच केंद्रीय कर्मचारी यांच्यासाठी कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध करून देणारे हॉस्पिटल असून, मेडिक्लेम धारकांसाठीही कॅशलेस सुविधा येथे उपलब्ध आहे.

कार्यक्रमास सन्माननीय श्री. के. के. मौर्या सर (मुख्य महाप्रबंधक, OFDR), श्री. उत्पल श्रीवास्तव सर (महाप्रबंधक, OFDR), डॉ. प्रसाद सर (CMO, OFH), डॉ. लोंढे सर (संचालक, निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. युनियन असोसिएशनचे पदाधिकारी तसेच JCM सदस्यांनी उपस्थितांना आरोग्यविषयक मोलाचे मार्गदर्शन केले.

या आरोग्य शिबिरामध्ये एकूण १५१ कामगार बंधू-भगिनी व स्टाफ सदस्यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. आयुर्वेदिक उपचारपद्धती, रोगप्रतिबंधक उपाय व आरोग्य संवर्धनाबाबत या शिबिरातून महत्त्वपूर्ण जनजागृती करण्यात आली.

सर्व मान्यवरांचे आशिर्वाद, प्रशासनाचे सहकार्य व कार्यसमितीच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक आयुर्वेदिक मेडिकल कॅम्प यशस्वीपणे पार पडला.
या उपक्रमासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आयुध निर्माणी देहूरोड कार्यसमितीच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *