महाराष्ट्रा मध्ये ‘एकच ब्रँड.. छत्रपती शिवाजी महाराज’, संजय राऊत यांना नितेश राणेंचे उत्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १३ सप्टेंबर – मुंबई -:मुंबई असो की महाराष्ट्र.. एकच ब्रँड.. छत्रपती शिवाजी महाराज, असे म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या ठाकरे ब्रँडला उत्तर दिले आहे. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल. त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल, असे मत संजय राऊत यांनी मांडले होते. यावरून राणे बंधुंनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा एकदा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ब्रँडचे एक घटक आहेत. या वादाचा फटका त्यांनाही बसणार आहे, शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल. त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल, असे मत शिवसेने नेते संजय राऊत यांनी सामनाच्या आपल्या रोखठोक सदरात मांडले होते.

संज्या म्हणतो पवार आणि ठाकरे महाराष्ट्राचे ब्रँड आहेत. त्याला सांगा जगात ब्रँडची निर्मिती वस्तू विकायला केली जाते म्हणजे महाराष्ट्र विकला असं म्हणायचय काय??? महाराष्ट्राने अनेक लोकांना मोठं केलं, हे राज्य कोणाच्या बापाचे नाही. हे राज्य जनतेने मोठे केले कुठल्या विकाऊ ब्रँडने नाही.

— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 13, 2020

भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत ट्विट केले की, पवार आणि ठाकरे महाराष्ट्राचे ब्रँड आहेत. जगात ब्रँडची निर्मिती वस्तू विकायला केली जाते म्हणजे महाराष्ट्र विकला असं म्हणायचय काय?? महाराष्ट्राने अनेक लोकांना मोठं केलं, हे राज्य कोणाच्या बापाचे नाही. हे राज्य जनतेने मोठे केले कुठल्या विकाऊ ब्रँडने नाही.

मुंबई असो कि महाराष्ट्र.. एकच ब्रँड..

छत्रपती शिवाजी महाराज!!

— nitesh rane (@NiteshNRane) September 13, 2020

निलेश राणे यांच्यानंतर त्यांचे बंधू नितेश राणे यांनी देखील मुंबई असो की महाराष्ट्र.. एकच ब्रँड.. छत्रपती शिवाजी महाराज, असे म्हणत संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *