SBI ची FD दरात कपात, काय आहेत नवीन व्याज दर?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १३ सप्टेंबर – नवीदिल्ली -:स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI ) मुदत ठेवीच्या म्हणजे फिक्स्ड डिपॉजिट (FD) च्या व्याज दरात पुन्हा एकदा बदल केला आहे. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याज दर 1 वर्षापासून 2 वर्षांपेक्षा कमी केला आहे. 0.20 टक्के अशी ही कपात करण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एफडीच्या इतर सर्व मॅच्युरिटी पीरियड्सवरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याआधी 27 मे रोजी एसबीआयने मुदत ठेवींवरील व्याज दरात बदल केले होते.

SBI ने केलेल्या नवीन बदलांनंतर, 7 दिवस ते 45 दिवसांदरम्यान आता SBI एफडीमध्ये 2.9% आणि 46 दिवस ते 179 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींमध्ये 3.9% रक्कम ग्राहकांना मिळणार आहे. तर 180 दिवस ते एका वर्षापेक्षा कमी वेळेची एफडी असेल तर त्यामध्ये ग्राहकांना 4.4 टक्के रक्कम मिळेल. 1 वर्षापासून 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवी 5.1% ऐवजी आता 4.9% देण्यात आली आहे. 2 वर्ष ते 3 वर्षापेक्षा कमी कालावधीत 5.1% एफडी मिळेल. तर 3 ते 5 वर्षापेक्षा कमी एफडीला 5.% आणि 5 वर्षात आणि 10 वर्षापर्यंत मुदत ठेवी मिळते.

दरम्यान, SBI ने ज्येष्ठ नागरिकांसाठी रिटेल टर्म डिपॉझिटमध्ये ‘SBI Wecare’ ही नवीन ठेव योजना सुरू केली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना एफडीच्या व्याज दरावर सामान्य नागरिकांकडून 0.50 टक्के फायदा मिळणार आहे. तर या व्यतिरिक्त 0.30% अतिरिक्त लाभ मिळणार आहे. पण ज्येष्ठ नागरिक केवळ 5 वर्ष किंवा त्याहून अधिक मुदतीच्या एफडीवरच हा लाभ घेऊ शकतात.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना मॅच्योरिटी पीरियड एफडीवरील व्याज दरामध्ये सर्वसामान्यांपेक्षा 0.80 टक्के अधिक व्याज मिळेल. एसबीआय वेअर डिपॉझिट योजनेचा लाभ 31 डिसेंबर 2020 पर्यंत मिळू शकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *