महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी- मंगेश खंडाळे | दि. १० | प्रभाग क्रमांक १५ मध्ये भाजपचे उमेदवार शैलजाताई मोरे, शर्मिला बाबर, राजू मिसाळ आणि अमित गावडे यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रचाराचा जोरदार झंझावात निर्माण केला. सकाळच्या सत्रात सेक्टर २७, मधील राहुल मेडिकलपासून सुरू झालेला प्रचार दौरा विविध भागांतून मार्गक्रमण करत नागरिकांशी थेट संवाद साधणारा ठरला, तर संध्याकाळी आकुर्डी गावठाण परिसरात काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेने प्रचाराला वेगळीच ऊर्जा दिली. गल्लीबोळ, चौक आणि मंदिर परिसरातून ही पदयात्रा जात असताना “विकासालाच मत” हा सूर ठळकपणे उमटताना दिसून आला.
सकाळच्या सेक्टर २७, च्या प्रचार दौऱ्यात राहुल मेडिकल, शर्मिला महाजन यांचे घर, प्रसाद यादव यांचे घर, स्टर्लिंग दवाखाना परिसर, गीताताई आफळे यांचे घर, भेळ चौक, कृष्ण मंदिर परिसर आणि सोमेश्वर मंदिर या भागांचा समावेश होता. या दौऱ्यात उमेदवारांनी घराघरांत जाऊन नागरिकांच्या समस्या ऐकल्या. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य सुविधा आणि सार्वजनिक सोयी-सुविधा या मुद्द्यांवर नागरिकांनी अपेक्षा मांडल्या, तर उमेदवारांनी आतापर्यंत केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडत पुढील विकासाचा आराखडा स्पष्ट केला.
संध्याकाळी आकुर्डी गावठाण परिसरात झालेल्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद लाभला. ही पदयात्रा केवळ प्रचारापुरती मर्यादित न राहता, कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग असलेली ‘विश्वासयात्रा’ ठरली. ढोल-ताशांचा गजर, घोषणा आणि थेट संवादामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. “काम बोलते, शब्द नव्हे,” ही भाजपची भूमिका या पदयात्रेतून प्रभावीपणे मांडण्यात आली.
या प्रचारात भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अनुप मोरे, माजी महापौर आर. एस. कुमार, सलीमभाई शिकलगार, अतुल इनामदार, अरुण थोरात, सचिन कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, शिनकर काका, शाहीर प्रकाश ढवळे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. एकूणच, प्रभाग १५ मध्ये भाजप उमेदवारांचा प्रचार म्हणजे केवळ घोषणा नसून, प्रत्यक्ष कामावर आधारित विश्वास निर्माण करणारी चळवळ ठरत असल्याचे चित्र दिसून आले.
आकुर्डी गावठाण परिसरातील संध्याकाळच्या पदयात्रेत उपस्थिती :भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष अनुप मोरे, माजी महापौर आर. एस. कुमार, सलीमभाई शिकलगार, अतुल इनामदार, अरुण थोरात, सचिन कुलकर्णीमिलिंद कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, शिनकर काका, शाहीर प्रकाश ढवळे, नरेंद्र येलकर, सुहास करडे, खेमराज काळे, जयवंत काळभोर, रामभाऊ पांढरकरश्रीकांत ऊर्फ अण्णा बुट्टे पाटील, अनिकेत पाडळे, किरण जगताप, मुझीद इनामदार, बंटी काळभोर, सुरज जगताप, सुमेध बागल, प्रसाद मोरे, आशिष शिंदे,अविनाश चव्हाण, पंढरी थरकुडे
