प्रभाग १५ : प्रचाराचा रणसंग्राम, शेवटच्या रविवारी भाजपचा जोरदार ‘शंखनाद’

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ११ | प्रभाग क्रमांक १५ मधील निवडणूक प्रचार आता अक्षरशः अंतिम टप्प्यात येऊन ठेपला असून, शेवटच्या रविवारी भारतीय जनता पक्षाने आपली सारी ताकद पणाला लावली आहे. “आता नाही तर कधीच नाही” अशा निर्धाराने भाजपचे अधिकृत उमेदवार शैलजाताई मोरे, शर्मिला बाबर, राजू मिसाळ व अमित गावडे हे चौघेही रस्त्यावर उतरले होते. सेक्टर २५ परिसरात झालेली ही प्रचार फेरी म्हणजे केवळ पदयात्रा नव्हे, तर जनतेशी थेट संवाद साधणारा राजकीय हुंकार होता. सोमेश्वर मंदिरापासून सुरुवात होऊन आयुर्वेदिक कॉलेज परिसर, बी फिट जिम ते सेक्टर २६ स्वामी समर्थ मंदिरापर्यंत ही फेरी गेली आणि प्रत्येक वळणावर “विकास”, “विश्वास” आणि “स्थैर्य” यांचेच सूर ऐकू येत होते.

या प्रचार दौऱ्याला कार्यकर्त्यांची मोठी फौज लाभली होती. भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष अनुप मोरे यांच्या उपस्थितीने प्रचाराला युवकांचा जोश लाभला. सलीम भाई शिकलगार, अतुल इनामदार, सचिन कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, शिनकर काका, शाहीर प्रकाश ढवळे यांच्यासह अनेक ज्येष्ठ व तरुण कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून चालताना दिसले. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. मीनाक्षी शहा, नीलिमा कोल्हे, संध्या पालांडे, संगीता बोलोद्रा, सुषमा लाड आदी महिला कार्यकर्त्यांनी प्रचारात वेगळीच ऊर्जा निर्माण केली. हा प्रचार म्हणजे घोषणांचा गदारोळ नसून, ओळखीचा, आपुलकीचा आणि विश्वासाचा संवाद होता.

दरम्यान, सिंधुनगर युवक मित्र मंडळानेही स्वतंत्रपणे मैदानात उतरून भाजपचा प्रचार केला. एलआयसी परिसरात आर. एस. कुमार व अरुण थोरात (LIG) यांच्या पुढाकाराने झालेला वैयक्तिक प्रचार हा ‘शांत पण परिणामकारक’ असा ठरला. अरुण थोरात, किशोर गवळी, गणेश जाधव, प्रदीप लिंगावत, सत्यान देशमुख, महेश अर्नालकर, जालिंदर कदम, विवेक पाटील, आकाश थोरात, करण सूद, अनिश जाधव, तेजस थोरात, अथर्व पाटील, सुनील बुराडे व मोहित थोरात या सर्वांनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला.

एकंदरीत, प्रचाराचा हा शेवटचा रविवार म्हणजे जणू निवडणुकीपूर्वीची शेवटची घंटा ठरली. आता आश्वासनांची जागा अपेक्षांनी घेतली आहे आणि भाषणांपेक्षा मतपेटीच जास्त बोलकी ठरणार आहे. प्रभाग १५ मध्ये प्रचाराचा पडदा खाली येत असताना, भाजपने मात्र शेवटच्या क्षणापर्यंत मैदान सोडायचे नाही, हेच या रविवारी स्पष्टपणे दाखवून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *