प्रभाग १५ मध्ये प्रचार नाही, उत्सव सुरू आहे!

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १२ | पीसीएमसी प्रभाग क्रमांक १५ मध्ये सध्या राजकारणाचा खेळ नेहमीसारखा राहिलेला नाही; तो आता लोकसहभागाचा जल्लोष झाला आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार शैलजाताई मोरे, शर्मिला बाबर, राजू मिसाळ व अमित गावडे हे चौघेही केवळ निवडणूक लढवत नाहीत, तर विकासाचा जाहीरनामा लोकांच्या दारात घेऊन पोहोचत आहेत. त्यांच्या प्रचारात दिसणारी शिस्त, संवाद आणि आत्मविश्वास पाहता , “इथे घोषणा ओरडल्या जात नाहीत, इथे विश्वास शांतपणे रुजवला जातो!” प्रभागातील रस्ते, पाणी, स्वच्छता, सुरक्षा आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर या चौघांची ठाम भूमिका असल्याने मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रचाराला बळ देणारी गोष्ट म्हणजे नेतृत्वाची आणि कार्यकर्त्यांची भक्कम फळी. भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष अनुप मोरे, माजी महापौर आर. एस. कुमार साहेब, सलीम भाई शिकलगार यांच्यासह अतुल इनामदार, अरुण थोरात, सचिन कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, शिनकर काका, शाहीर प्रकाश ढवळे, अमोल भोईटे आणि असंख्य ज्येष्ठ–तरुण कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून मैदानात उतरले आहेत. महिला कार्यकर्त्यांची उपस्थितीही तितकीच प्रभावी आहे—शकुंतला गावडे, अश्विनी लायगुडे, अपर्णा मिसाळ, तृषा गावडे, नीलिमा फटांगरे यांच्यासह अनेक भगिनी प्रचारात सक्रिय आहेत. त्यामुळे हा प्रचार एका पक्षाचा न राहता, संपूर्ण प्रभागाचा सहभाग बनला आहे.

सोमवार, १२ जानेवारी रोजी सकाळी सेक्टर २६ परिसरात होणारी प्रचार फेरी ही केवळ नियोजित कार्यक्रम नसून, भाजपच्या संघटनशक्तीचे दर्शन घडवणारी ठरणार आहे. स्वामी समर्थ मंदिरापासून सुरू होणारी ही फेरी म्हणजे आशीर्वाद, आशा आणि आत्मविश्वास यांची सांगड आहे. प्रभाग १५ मध्ये आज जो उत्साह दिसतो आहे, तो पाहता सांगायचे तर—“ही निवडणूक जिंकण्याचा प्रश्न नाही; लोकांनी आधीच मनाने मत दिले आहे!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *