![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १३ |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. घरातील टापटीपीवर लक्ष द्याल. वैवाहिक सौख्यात भर पडेल. भागीदाराशी संबंध सुधारतील. तुमचा परिचय अधिक वाढेल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
हाताखालील नोकरांकडून कामे जलद गतीने पार पडतील. कामे मनाजोगी पार पडतील. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. जवळचे नातेवाईक भेटतील. दिवस मजेत जाईल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
जुकरमणुकीवर अधिक बर द्याल. मैत्रीचे संबंध अधिक घट्ट होतील. स्वच्छंदीपणे विचार कराल.छंद जोपासाल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
कामातील अडचणी दूर कराव्यात. उत्साहाने कामे हाती घ्याल. कामामुळे थकवा जाणवू शकतो. तत्परतेने कामे कराल.वादाचे प्रसंग टाळावेत.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
जुन्या गोष्टी फार मनावर घेवू नयेत. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. पायाचे विकार जाणवतील. घराबाहेर वावरतांना काळजी घ्यावी. झोपेची तक्रार जाणवेल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
कुटुंबाच्या प्रगतीचा आधी विचार कराल. आर्थिक उन्नती साधता येईल. कौटुंबिक सौख्यात भर पडेल. स्थावर मालमत्ता वाढवाल. घराचे नुतनीकरण कराल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
कामात सकारात्मक बदल करावेत. कामाची गती वाढेल. मनाजोगा फायदा करून घेता येईल. व्यापाऱ्यांनी सतर्कता दाखवावी. सरकारी कामावर वेळ खर्च होईल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
चुकीच्या संगतीत अडकू नका. मनात आकारण भीती बाळगू नका. मानसिक चंचलता जाणवेल. दूरच्या प्रवासाचे योग येतील.धार्मिक कामात सहभाग घ्याल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope )
काही कामांना पुरेसा वेळ द्यावा. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. स्त्रीदाक्षिण्य दाखवाल. जवळचे मित्र भेटतील.एकाच गोष्टीवर फार काळ रेंगाळत राहू नका.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
जोडीदाराचे कौतुक कराल. सामाजिक वजन वाढेल. नावलौकिकास पात्र व्हाल. अपेक्षित वेळेत कामे पूर्ण होतील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
कामावर श्रद्धा ठेवाल. वैचारिक भव्यता दाखवाल. बौद्धिक दृष्टीकोनातून विचार कराल. दानशूरता दाखवाल. स्वत:चा मान जपाल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
मुलांच्या कारवायांकडे लक्ष द्यावे. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा.अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक गैरसमज टाळावेत. हितशत्रूंवर लक्ष ठेवावे.