महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १४ सप्टेंबर – नवीदिल्ली -: आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. त्याआधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. देशातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येवर त्यांनी सरकारवर निशाणा साधला असून, स्वतःचे प्राण स्वतःच वाचवा असे म्हटले आहे.
राहुल गांधींनी ट्विट केले की, कोरोना संसर्गाचे आकडे या आठवड्यात 50 लाख आणि अॅक्टिव्ह केस 10 लाखांच्या पुढे जातील. अनियोजित लॉकडाऊन हा एका व्यक्तीच्या अंहकाराचे देने आहे, ज्यामुळे देशभरात कोरोना पसरला. आत्मनिर्भर अभियानावरून टोला लगावत ते म्हणाले की, मोदी सरकारने म्हटले आहे आत्मनिर्भर बना म्हणजेच स्वतःचे प्राण स्वतः वाचवा. कारण पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत.
https://twitter.com/RahulGandhi/status/1305347232070209538?s=20
दरम्यान, आजपासून 18 दिवसांचे संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यात सीमेवरील चीनची घुसखोरी, कोरोना रुग्णांची संख्या, अर्थव्यवस्थेचा मुद्दा विरोधी पक्ष मांडण्याची शक्यता आहे. राहुल गांधी हे सोनिया गांधींसोबत उपचारासाठी अमेरिकेला गेले असल्याने, ते काही दिवस अधिवेशनला उपस्थित राहू शकणार नाहीत.