महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १५ सप्टेंबर – पिंपरी चिंचवड – पिंपरी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अण्णा बनसोडे यांच्या सहकार्याने (मदत नव्हे कर्तव्य) पिंपरी चिंचवड शहर अपंग सेल मार्फत मिलिंदनगर, बौध्दनगर , भीमनगर लिंक रोड , सुदर्शननगर, शास्त्रीनगर , सुभाषनगर, श्रमिकनगर, कैलासनगर, संजय गांधी नगर, आत्मानगर , आशोकनगर,इंदिरानगर, गणेशनगर , या भागातील २५० जणांना व मोरवाडी लालटोपीनगर, वल्लभनगर, संततुकारामनगर , खराळवाडी, म्हाडा काॅलनी या भागातील १७० दिव्यांगना गहू, तांदूळ, सोयाबीन, लाल तिखट, कांदा लसून मसाला, व मास्क वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी अपंग सेल चे शहर उपाध्यक्ष श्री आनंद बनसोडे , श्री बाळासाहेब तरस, महादेव बनसोडे योगेश सोनार , रवी भिसे व दिव्यांग बांधव व भगिनी उपस्थित होत्या.