‘एक विधानसभा-एक घर’ , गरजूंना रुग्णालयाची बिले भरण्यास मदत करा ; आमदार चंद्रकांत पाटील

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १५ सप्टेंबर – पुणे -करोनाचा संसर्ग वाढत असून, सध्या कठीण काळ सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांना मदतीची आवश्यकता असून, त्यासाठी प्रत्येक नगरसेवक, भाजपच्या कार्यकर्त्याने सक्रिय राहिले पाहिजे. नगरसेवकांनी तर आपला फोन शक्यतो बंद राहणार नाही, याची काळजी घेऊन पहाटे तीनला देखील नागरिकांचे फोन स्वीकारावेत,’ अशा स्पष्ट सूचना रविवारी रात्री भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोअर कमिटीमध्ये शहरातील पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महापालिका असो की खासगी रुग्णालय, याठिकाणी ऑक्सिजनसज्ज खाटा तसेच व्हेंटिलेटर वाढविण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची आवश्यकता आहे. ऑक्सिजनसज्ज खाटा वाढल्या पाहिजेत, त्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न झालेच पाहिजेत. खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनसज्ज खाटा वाढविणे शक्य असेल, केवळ आर्थिक परिस्थितीमुळे त्या वाढत नसतील, तर तेथे संबंधितांना मदतीची भूमिका घ्या आणि या खाटा वाढवा. सध्या नागरिकांना आक्सिजनसज्ज खाटांची आवश्यकता असून, त्यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करा, अशा सूचना पाटील यांनी दिल्या.

शहरात अॅम्बुलन्सचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे इनोव्हा, तसेच इतर कारच्या अॅम्बुलन्स तयार करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या. त्याला येणारा खर्च भाजपने करेन. मात्र, नागरिकांना अडचण येणार नाही, याची काळजी घ्या. सर्वसामान्य आणि गरजूंना रुग्णालयाची बिले भरण्यास मदत करा. सरकारी दराप्रमाणे बिलांची आकारणी झाली की नाही, याची खातरजमा करून ही बिले भरावीत, अशा सूचना पाटील यांनी केल्या. ‘एक विधानसभा-एक घर’ हे अभियान जोरदार राबवित नागरिकांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *