नोकरी विषयक ; पदवीधरांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ; हजारो जागांची भरती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १५ सप्टेंबर – मुंबई -कोणत्याही विषयीतील पदवीधर उमेदावारासाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. खासकरून बँकेत नोकरी करण्यास इच्छूक असणारे या संधीचा फायदा घेऊ शकतात. इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (आयबीपीएस) देशभरातील विविध सरकारी बँकांमध्ये क्लर्क पदासाठी हजारो जागांची भरती करणार आहे.

यासाठी नॉटिफिकेशन जारी करण्यात आले असून, एकूण 2556 जागांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 371 पदांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या तारखा –
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 2 सप्टेंबर 2020
ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख – 23 सप्टेंबर 2020
अर्जाची फी भरण्याची अंतिम तारीख – 23 सप्टेंबर 2020
कॉल लेटर डाऊनलोड करण्याची तारीख – 18 नोव्हेंबर 2020
पुर्व परीक्षा – 5, 13 आणि 13 डिसेंबर 2020
पुर्व परीक्षेचा निकाल – 31 डिसेंबर 2020
मुख्य परीक्षा – 24 जानेवारी 2021

अर्ज शुल्क –जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 850 रुपये आहे. तर एससी/एसटी, दिव्यांग उमेदवारांसाठी 175 रुपये आहे.

शिक्षण व वयाची अट –इच्छुक उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराचे वय किमान 20 आणि कमाल 28 वर्ष असणे गरजेचे आहे. आरक्षित वर्गांना वयात सूट मिळेल.

निवड प्रक्रिया –उमेदवारांची निवड पुर्व व मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारावर केली जाईल. दोन्ही परीक्षा ऑनलाईन होतील. अधिक माहितीसाठी व नॉटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा. अर्ज करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/ या लिंकला भेट द्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *