महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १५ सप्टेंबर – पुणे : देशातील कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी कांदा निर्यात होत असेल तर सरकारची काय अडचण आहे. उलट फायदाच आहे. परकीय चलन उपलब्ध होईल व ग्रामीण अर्थव्यवस्थाही सूधारेल. शेतकरी च्या हातात पैसा आला की बाजारात चलनाची देवान घेवान वाढेल, परिणामी आर्थिक परीस्थिती सुधारेल.
कांदावर निर्यात बंदी घातल्याने देशात कांद्याचे भाव नियंत्रणात राहतील हा हेतू सरकारचा बरोबर असला तरी सध्या अर्थव्यवस्थेच्या व शेतकरीच्या दृष्टीने कांदावर निर्यात बंदी हा निर्णय पुर्णपणे चुकीचा आहे…. सरकारने जनतेला आवाहन केले तर देशाच्या भल्यासाठी देशातील जनता थोडे दिवस कादा काटकसरीने वापरेन. सरकारने घेतलेला चुकीचा निर्णय ताबडतोब मागे घेने आवश्यक आहे. अपेक्षा बाळगू या की सरकार जनतेचा ही आवाज कधीतरी ऐकेन. “जय जवान जय किसान”………..पि.के.महाजन.