![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ मार्च २०२६ ।।
मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope)
आपल्या व्यक्तिमत्वाला अधिक उठाव येईल. तरुणांच्या संगतीत दिवस घालवाल. लहान मुलांच्यात खेळाल. चौकसपणा दाखवाल. तुमच्यातील भावनाशीलता दिसून येईल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope)
अधिकार्यांचा सल्ला घ्यावा लागेल. सामाजिक कामात पुढाकार घ्याल. स्वत:चा मान राखून वागाल. मुलांचे मत विचारात घ्यावे. कमिशन मधून फायदा मिळेल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope)
चैनीच्या वस्तु खरेदी कराल. व्यापारी वर्गाचा आर्थिक स्तर सुधारेल. सहकुटुंब मौज-मजेचा बेत आखाल. हातातील अधिकार वापरण्याची संधि मिळेल. महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पाऊले उचलाल.
कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope)
सर्वासमोर आपली कला सादर करता येईल. घरासाठी सजावटीचे सामान खरेदी केले जाईल. टाप-टिपीकडे अधिक लक्ष द्याल. स्वत:चा मान वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. कामाचा उत्तम मोबदला मिळेल.
सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope)
पोटाची तक्रार जाणवेल. वात-विकाराकडे दुर्लक्ष करू नका. योग्य संधीची वाट पाहावी. सहकुटुंब प्रवास कराल. पत्नीचा सुस्वभावीपणा दिसून येईल.
कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope)
अचानक धनलाभ संभवतो. जुनी येणी वसूल होतील. जोडीदाराचे कौतुक केले जाईल. नातेवाईकांचा गैरसमज दूरकरावा. मुलांच्या खोडकरपणात वाढ होईल.
तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope)
प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. भागीदारीच्या व्यवसायाला अधिक गती येईल. संपर्कातील लोकांशी एकोपा वाढेल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. मौज-मजेकडे कल राहील.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope)
हाताखालील नोकरांचे सहकार्य मिळेल. कामे वेळेत पूर्ण करता येतील. कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल. उगाचच चीड-चीड करणे टाळावे. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात.
धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope)
आवडते पुस्तक वाचायला मिळेल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. बुद्धी आणि ज्ञान ह्यांचा सुयोग साधाल. चौकसपणे माहिती गोळा कराल. भावंडांची उत्तम साथ मिळेल.
मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope)
जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. काम आणि वेळ ह्यांचा समन्वय साधावा. रागावर नियंत्रण ठेवावे. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. तीर्थयात्रेसाठी नाव नोंदवाल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope)
अघळपघळ बोलणे टाळा. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. हस्तकलेचा प्रसार करता येईल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. थोर व्यक्तींचे मार्गदर्शन घ्याल.
मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope)
मानसिक शांतता जपावी. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. मुलांच्या आनंदात रमून जाल. जवळचे नातेवाईक भेटतील. दिवसभर घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.