Horoscope Today दि. २९ मार्च २०२६ ; आज चंचलतेवर मात करावी. … ..; पहा बारा राशींचं भविष्य

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ मार्च २०२६ ।।

आजचे मेष राशिभविष्य (Aries Today Horoscope)
घरातच मन रमेल. घरात टापटीप ठेवाल. जुनी पुस्तके काढून वाचत बसाल. चटपटीत पदार्थ खाल. दिवस मजेत घालवाल.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
मित्रांशी गप्पा माराल. जवळचा प्रवास कराल. नवीन गोष्टींची माहिती जमवाल. भावंडांशी सलोखा वाढेल. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
पत्नीचा सहवास हवाहवासा वाटेल. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. फार थंड पदार्थ खाऊ नयेत. काही कामे उगाचच अडकून पडतील. स्वप्नात रमून जाल.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
उगाचच घाई-घाई करू नका. आपल्या मर्जीने वागाल. बाहेरील गोष्टींचा फार विचार करू नका. चंचलतेवर मात करावी. मनातील आकांक्षा पूर्ण होईल.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Today Horoscope )
विचारात वाहून जाऊ नका. मानसिक स्थैर्य जपावे. हातातील कला सर्वांसमोर सादर करता येईल. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. भागीदारीत नफा मिळेल.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
इतरांचा विश्वास संपादन करावा. हातातील कामात यश येईल. घरगुती प्रश्न सोडवावेत. नातेवाईकांची मदत मिळेल. आत्मविश्वास सोडून चालणार नाही.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Today Horoscope)
गैरसमजाला मनात जागा देऊ नका. मुलांशी खेळण्यात वेळ घालवाल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी. गृहशांती जपावी लागेल. मुलांची मते जाणून घ्यावीत.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
धाडस करतांना सतर्क राहावे. शा‍ब्दिक चकमक टाळावी. हातापायांना किरकोळ इजा संभवते. कामातून समाधान शोधावे. जोडीदाराचे सौख्य वाढीस लागेल.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
फसवणुकीपासून सावध राहावे. बाहेर फिरताना मौल्यवान गोष्टी सांभाळाव्यात. अनाठायी खर्च होऊ शकतो. अपयशाने खचून जाऊ नका. धार्मिक गोष्टीत मन रमवा.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
अडथळ्यातून मार्ग काढावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. आततायीपणे निर्णय घेऊ नका. इतरांच्या मनाचा विचार करावा. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा लागेल.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
अधिकारी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. चित्त एकाग्रतेसाठी ध्यानधारणा करावी. गरज नसतांना खर्च करू नका. आपली संगत तपासून पहावी. जबाबदारीची जाणीव ठेवावी.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
काही कामे वेळ घालवतील. उगाचच खिळून पडल्यासारखे वाटू शकते. मनातील भीती बाजूला सारावी. स्वत: साठी वेळ बाजूला काढावा. उष्णतेचा त्रास जाणवेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *