![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ एप्रिल २०२६ ।।
मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope)
पैज जिंकता येईल. कौटुंबिक गोष्टीला प्राधान्य द्याल. मानसिक चंचलता जाणवेल. हजरजबाबीपणे उत्तर द्याल. आपल्या मतावर ठाम राहाल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope)
कामातील चिकाटी सोडू नका. क्षुल्लक कारणांमुळे नाराज होवू नका. खोट्या गोष्टींचा आधार टाळावा. कुटुंबात तुमचा दबदबा राहील. घरगुती जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope )
भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल. तरूणांशी मैत्री कराल. ओळखीतील लोकांचा फायदा होईल. व्यावहारिक कल्पकता दाखवाल. व्यावसायिक गोष्टींचा योग्य अंदाज बांधावा.
कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope )
फायदेशीर गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. व्यावसायिक लाभाकडे लक्ष केन्द्रित करावे लागेल. स्त्री सौख्याचा लाभ होईल.
सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope)
काहीसे धोरणीपणे वागाल. अडचणी वर मात करता येईल. सुट्टीतील प्रवासाचे नियोजन कराल. बौद्धिक चुणूक दाखवण्यास वाव मिळेल. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल.
कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope)
धार्मिक कामात मन रमवाल. वडीलधार्यांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. मुलांचे वागणे दुराग्रही वाटू शकते. अती विचार करू नका.
तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope)
जोडीदाराच्या स्वभावाचे कौतुक कराल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे हे ठरवावे लागेल. कौटुंबिक बाबी शांततेच्या मार्गाने घ्याव्यात. व्यावसायिक लाभाचा दिवस.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope)
भावंडांना मदत कराल. जोडीदाराचे विचार समजून घ्या. कामाच्या ठिकाणी तुमचा वाचक राहील. प्रगतीच्या मार्गाने वाटचाल कराल. आरोग्यात सुधारणा होईल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. फार चिंता करण्यात वेळ वाया घालवू नका. मदतीचा हात आनंदाने पुढे कराल. धार्मिक ग्रंथांचे वचन कराल.
मकर राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
मानसिक स्थैर्य जपावे. सारासार विचार करून निर्णय घ्यावा. कोणत्याही प्रकारचा आततायीपणा बारा नव्हे. मैत्रीचे संबंध दृढ होतील. अचानक धनलाभ संभवतो.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
सामुदायिक गोष्टींचे भान राखा. जोडीदाराच्या प्रेमळ सौख्यात रमून जाल. भावंडांची मदत घेता येईल. योग्य परिक्षणावर भर द्या. कामातील महत्त्वाच्या बाबी जाणून घ्याव्यात.
मीन राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
व्यावहारिक बुद्धिमत्ता दर्शवाल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. कामाचा पुरेपूर आनंद मिळवाल. मैत्रीचे नाते जपावे. व्यावसायिक वृद्धीचे नियोजन करावे.