भारताने तयार केली पहिली FELUDA CORONA TEST ; लवकर रिपोर्ट आणि स्वस्त

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २१ सप्टेंबर – सध्या कोरोनाव्हायरसचं निदान करण्यासाठी आरटी-पीसीआर टेस्ट केली जाते. या टेस्टचा रिपोर्ट येण्यासाठी वेळही जास्त लागतो, शिवाय खर्चही जास्त आहे. मात्र आता आरटी-पीसीआरइतकीच परिणामकारक मात्र त्यापेक्षा कमी खर्चिक आणि कमी वेळेत रिपोर्ट देणारी टेस्ट आता भारतात विकसित करण्यात आली आहे.

टाटा ग्रुप आणि सीएसआयआर इन्स्टिट्युट ऑफ जेनॉमिक्स अँड इन्टिग्रेटिव्ह बायोलॉजीने (CSIR-IGIB) एकत्रितरित्या कोरोना टेस्ट तयार केली आहे.
क्लस्टर्ड रेग्युलरली इंटरस्पेस्ड शॉर्ट पॅलिनड्रॉमिक रिपिट्स कोरोना टेस्ट म्हणजे क्रिस्पर कोरोना टेस्ट (CRISPR Corona Test) ज्याला फेलुदा (Feluda) असं नाव देण्यात आलं आहे.ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) ने फेलुदा टेस्टला परवानगी दिली आहे

टाटा समूहाच्या मते, CRISPR टेस्ट ही RT-PCR टेस्टप्रमाणेच परिणाम देणारी आहे. मात्र याचा रिपोर्ट लवकर मिळेल आणि किंमतही कमी आहे.
SARS-CoV-2 व्हायरसच्या जेनॉमिक सिक्वेंसचं निदान करण्यासाठी स्वदेशी CRISPR तंत्रज्ञानाचा वापर करतं. यामार्फत भविष्यात इतर महासाथीची टेस्टदेखील करता येऊ शकतेसीआरआईएसपीआर ही सीएएस-9 प्रोटीनचा वापर करणारी जगातील पहिली अशी टेस्ट आहे, जी यशस्वीरिक्या कोरोनाव्हायरसचं निदान करू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *