महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २२ सप्टेंबर – बँक फ्रॉडमध्ये अधिकतर ग्राहकांना ओटीपीच्या माध्यमातून शिकार बनवले जाते. त्याचप्रमाणे पेटीएम (Paytm) सारख्या मोबाइल वॉलेटचा वापर करून देखील केवायसी करण्याचा बहाणा देत पैसे लंपास केले जाऊ शकतात. लॉकडाऊननंतर अशा तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. या परिस्थितीत बँक देखील मदत करत नाही. त्यामुळे ग्राहकांनी त्यांच्या खात्याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे.
नुकतेच मुंबईतील एका व्यक्तीला बँकेच्या नावाने संपर्क करण्यात आला होता. त्या व्यक्तीला पेटीएमच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्याबाबत माहिती देण्यात आली. दुसरी गोष्ट अशी की ना त्या व्यक्तीकडे पेटीएम अकाउंट होते ना ही ती व्यक्ती इंटरनेट बँकिंगचा वापर करत होती.
जेव्हा त्यांनी फोन तपासला तेव्हा त्यांना कोणताही ओटीपी आला नव्हता. पण त्यांच्या खात्यातून अनेक पेटीएम खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते. त्यांच्या खात्यातून एकूण 42,368 रुपये लंपास करण्यात आले होते. पासबुक अपडेट केल्यानंतर त्यांना ही माहिती मिळाली. जेव्हा त्यांनी फोन तपासला तेव्हा त्यांना कोणताही ओटीपी आला नव्हता. पण त्यांच्या खात्यातून अनेक पेटीएम खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते.
पोलिसांत तक्रार केल्यानंतर त्यांना या फ्रॉडबाबत संपूर्ण माहिती मिळाली. ग्राहकाला ओटीपी का आला नाही, याबाबत बँकेला विचारणा करण्यात आली. बँकिंग डिटेल्स कसे लीक झाले याबाबत चौकशी सुरू आहेपोलिसांत तक्रार केल्यानंतर त्यांना या फ्रॉडबाबत संपूर्ण माहिती मिळाली. ग्राहकाला ओटीपी का आला नाही, याबाबत बँकेला विचारणा करण्यात आली. बँकिंग डिटेल्स कसे लीक झाले याबाबत चौकशी सुरू आहे
दरम्यान आजकाल फ्रॉडसाठी नवीन पद्धती वापरण्यात येत आहेत. आरबीआय वेळोवेळी ग्राहकांना याबाबत सतर्क करत असते. आरबीआयने कँपेनमध्ये फ्रॉडपासून वाचण्याच्या पद्धती सांगितल्या आहेत
आरबीआय आणि बँकिंग सेक्टरमधील जाणकार सांगतात की, इंटरनेट किंवा मोबाइल बँकिंग करताना सावधानता बाळगा. कोणालाही क्रेडिट-डेबिट कार्ड डिटेल्स देऊ नका. कोणत्याही पब्लिक वायफाय किंवा इंटरनेट नेटवर्कवरून बँकिंग ट्रान्झॅक्शन करू नका. बँक खाते मोबाइल नंबरशी जोडा. डेबिट कार्ड सीव्हीव्ही, पिन नंबर यांसारखी महत्त्वाची माहिती मोबाइलमध्ये ठेवू नका.
त्याचप्रमाणे कोणत्याही मोबाइल पेमेंट App ना अधिकतर Permission देऊ नका. शक्य असेल तर इंटरनेट बँकिंग किंवा ऑनलाइन बँकिंगसाठी एक असे बँक खाते ठेवा ज्यामध्ये जास्त पैसे नसतील. तुमचे बँक खाते कुठेही लिंक करताना सावधानता बाळगा. त्याचप्रमाणे तुमच्या बँकिंग कस्टमर केअरबाबत माहिती करून घ्या, अशी कोणतीही घटना झाल्यास कार्ड ब्लॉक करा.