![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जून २०२६ ।।
मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
गैरसमजुतीतून त्रास संभवतो. डोळ्यांची तपासणी करावी लागेल. सामुदायिक गोष्टींत फार लक्ष घालू नका. जवळचा प्रवास तूर्तास टाळावा. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल.
वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रेमाच्या दृष्टीने मैत्रीत सुधारणा होईल. काही कौटुंबिक चिंता सतावतील. मनाजोगी खरेदी करता येईल. हौस भागवणे शक्य होईल.
मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope )
मानसिक आंदोलनाला आवर घालावी. मनातील विचित्र कल्पना काढून टाका. क्षणिक सौख्याने हुरळून जाऊ नका. काही गोष्टीइच्छेविरूद्ध कराव्या लागतील. महत्त्वाची कामे आज टाळावीत.
कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
फार विचार करत बसू नका. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. डोळे झाकून कोणतेही कृत्य करू नका. फसवणुकीपासून सावध रहा. मानसिक चंचलता जाणवेल.
सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
आर्थिक लाभावर लक्ष केन्द्रित करा. तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक केले जाईल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. मिळालेल्या लाभाबाबत समाधानी रहा. इतरांचे मन जिंकून घेण्याचा प्रयत्न करा.
कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
विशाल दृष्टिकोन ठेवावा लागेल. कलेला पोषक वातावरण मिळेल. तुमच्यातील सुप्त गुण दाखवण्याची संधी मिळेल. भौतिक सुखापासून दूर राहाल. पत्नीचे वर्चस्व जाणवेल.
तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
कमी श्रमातून चांगला लाभ होईल. वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही. अपचनाचा त्रास जाणवेल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. महिलांना उत्तम गृहिणी पदाचा लाभ मिळेल.
वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
नवीन कामात सावधानता बाळगा. कौटुंबिक कामात विशेष लक्ष घालावे लागेल. प्रणयराधनेत सक्रियता वाढेल. आर्थिक लाभापेक्षा कामाचा आनंद मिळवाल. भागिदारीतून मनाजोगा नफा मिळेल.
धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
कष्टाला मागेपुढे पाहू नका. कौटुंबिक वातावरण तप्त राहील. जोडीदाराविषयी गैरसमज वाढू शकतात. हाताखालील नोकरांचे उत्तम सहकार्य लाभेल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.
मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
जवळच्या प्रवासात काळजी घ्या. भावंडांशी दुरावा वाढू शकतो. प्रेमसौख्याला अधिक बहार येईल. मुलांशी क्षुल्लक कारणांवरून खटके उडू शकतात. करमणुकीत अधिक वेळ घालवाल.
कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
बौद्धिक कामात सक्रिय राहाल. धार्मिक यात्रांचे आमंत्रण घेऊ नये. घरातील वातावरण प्रसन्न राहील. रेस-जुगारातून नुकसान संभवते. प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात.
मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
आपलेच म्हणणे खरे कराल. अती आत्मविश्वास बाळगून चालणार नाही. उघड-उघड शत्रुत्व पत्करू नका. जमिनीचे व्यवहार मार्गी लागतील. किरकोळ दुखापत संभवते.