Horoscope Today दि. २० जून २०२६ ; आज आर्थिक लाभाची शक्यता आहे …………… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० जून २०२६ ।।

मेष – आज आपणास आर्थिक व्यवहार सावधपणे करावे लागतील. वाद – विवादा पासून दूर राहिल्यास कुटुंबियांशी निर्माण होणारी कटुता टाळू शकाल. खाण्या – पिण्याची काळजी घ्या नाहीतर स्वास्थ्य बिघडवू शकते. विनाकारण खर्च होतील.

वृषभ – आजचा दिवस फायद्याने भरलेला आहे. आज आपण शरीर व मनाने स्वस्थ राहाल. तसेच पूर्ण वेळ ताजेतवाने राहाल. आपल्यात असलेली कलात्मकता व सृजनात्मकता यांचा उपयोग कराल. आर्थिक योजना बनवाल. धनलाभ सुद्धा होऊ शकतो.

मिथुन – आज आपल्या उक्ती व कृती मुळे काही अडचणी निर्माण होतील. आपला आवेश व उग्रपणा ह्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृतीस त्रास संभवतो. विशेषतः नेत्रविकार त्रास देतील. एखादा अपघात संभवतो.

कर्क – आजचा दिवस आर्थिक नियोजन व नव कार्यारंभ करण्यासाठी उत्तम आहे. उद्योग – व्यवसायात लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नाच्या मार्गांत वाढ झाल्याने आपणाला खूप आनंद व समाधान वाटेल. मित्र, पत्नी, संतती अशा सर्वांकडून आनंददायी बातम्या मिळतील.

सिंह – आज आपणास प्रत्येक कामात उशीरा यश मिळेल. कार्यालयात किंवा घरात जबाबदार्‍यांचे ओझे वाढेल. जीवनात अधिक गंभीरतेचा अनुभव होईल. नवीन संबंध स्थापित करणे किंवा कामासंबंधी महत्वाचा निर्णय घेणे हे टाळा.

कन्या – आजचा दिवस आपला परोपकारी कार्यात खर्च होईल. एखाद्या प्रवासात संवाद साधण्याची संधी मिळेल. परदेशगमनाचे योग येतील. भावंडांकडून लाभ होईल. कार्यालयात वरिष्ठांपासून सांभाळून राहा.

तूळ – आज शक्यतो कोणत्याही नवीन कामाचा आरंभ न करणे हिताचे राहील. आपले वक्तव्य व वर्तन नियंत्रणात ठेवल्यास संभाव्य गैरसमज टाळून होणारे नुकसान टाळू शकाल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

वृश्चिक – आजचा दिवस आपण आनंद उल्हासात घालवाल. रोजच्या कामातून वेळ काढून स्वतःसाठी थोडा वेळ काढू शकाल. मित्रांसह एखाद्या प्रवासास जाल. उत्तम भोजन व नवीन आभूषणे मिळाल्याने आपण खूप आनंदित व्हाल.

धनु – आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे . घरात आनंदाचे वातावरण राहील. नोकर व सहकारी आपणाला मदत करतील. कार्यात सफलता व यश मिळेल.

मकर – आज कला व साहित्य क्षेत्रात असणार्‍या व्यक्ती त्या क्षेत्रात विशेष कामगीरी करतील. आपल्या रचनात्मक व सृजनशील शक्तींचा इतरांना परिचय द्याल. प्रेमिकांना परस्परांत गाढ प्रेमाचा अनुभव येईल.

कुंभ – आज स्वभाव जास्त हळवा बनल्याने मानसिक अस्वास्थ्य राहील. आर्थिक बाबींचे नियोजन कराल. आईकडून अधिक प्रेमाचा वर्षाव झाल्याचा अनुभव येईल. स्त्रिया सौंदर्य – प्रसाधने, वस्त्र, अलंकार यांवर जास्त खर्च करतील. विद्यार्थ्यांना यश लाभेल.

मीन – आजचा दिवस महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहे. आपली सृजनशक्ती वाढेल. स्थिर विचार व खंबीर मन ह्यामुळे कार्य चांगल्या प्रकारे करू शकाल. मित्रांसह प्रवास – पर्यटन होऊ शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *