Horoscope Today दि. १९ जून २०२६ ; आज संघर्षमय स्थिती निवळण्याचा प्रयत्न करा…………… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ जून २०२६ ।।

मेष राशीचे राशिभविष्य (Aries Daily Horoscope)
मानसिक द्विधावस्था जाणवेल. अती विचारात वेळ वाया जाईल. कौटुंबिक गोष्टीला अधिक प्राधान्य द्या. सामुदायिक वादापासून दूर रहा. कामात काहीशी प्रतिकूलता जाणवेल.

वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Daily Horoscope)
मित्रमंडळींशी वाद संभवतात. अधिकारी वर्गाचा पगडा राहील. कष्ट अधिक व वेळ कमी अशी स्थिती राहील. मौल्यवानवस्तूंचा लाभ होईल. कौटुंबिक प्रश्नांबाबत चिंता वाटेल.

मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Daily Horoscope)
मानसिक स्थैर्यासाठी ध्यानधारणा करा. पैशाचा अपव्यय टाळा. मोहाला बळी पडू नका. अती अपेक्षा बाळगून चालणार नाही. कर्जाचे व्यवहार तूर्तास टाळावेत.

कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Daily Horoscope)
भावनेच्या आहारी जाऊ नका. मनात नसत्या कल्पना रंगवत बसू नका. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. हट्टीपणाने वागून चालणार नाही. मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात.

सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Daily Horoscope)
छुप्या शत्रूंचा त्रास संभवतो. हातातील लाभाबाबत गाफिल राहू नका. योग्य संधीसाठी वाट पहावी लागेल. पायाचे विकार बळावू शकतात. किरकोळ जखमांकडे वेळीच लक्ष द्या.

कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Daily Horoscope)
काही गोष्टी जुळवून घ्यावा लागतील. उगाच विरोधाला विरोध करत बसू नका. अधिकाराचा योग्य वापर करा. वेळेचे योग्य नियोजन करावे. रागावर नियंत्रण ठेवा.

तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Daily Horoscope)
उष्णतेच्या तक्रारी जाणवू शकतात. तिखट व तामसी पदार्थ खाण्याची इच्छा होईल. कमी श्रमातील कामाकडे लक्ष द्याल. अचानक धनलाभाची शक्यता. भांडकुदळ व्यक्तींपासून दूर रहा.

वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope)
वैवाहिक सौख्यात भर पडेल. मुलांचे स्वतंत्र विचार समजून घ्यावेत. कसरत करण्याकडे अधिक कल राहील. संपर्कातील लोकांशी मैत्री वाढेल. मानसिक अशांततेच्या आहारी जाऊ नका.

धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope)
कौटुंबिक गोष्टी प्राधान्याने सोडवा. दुचाकी वाहन चालवताना अधिक काळजी घ्यावी. संघर्षमय वातावरणाचा ताण कमी करा. जमिनीच्या कामातून लाभ होईल. मनात शंकेला थारा देऊ नका.

मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope)
सारासार विचार करून निर्णय घ्या. स्वमतावर आग्रही राहाल. प्रतिकूलतेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. संघर्षमय स्थिती निवळण्याचा प्रयत्न करा. इतरांवर फार विसंबून राहू नका.

कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope)
अती उदारपणा दाखवणे योग्य नाही. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. स्वभावात काहीसा लहरीपणा येईल. दिवसभर काही न काही खटपट करत रहा. मनाजोगी खरेदी करता येईल.

मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Daily Horoscope)
उद्दिष्ट साध्य करण्यासाठी झटाल.वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. नवीन उर्जेने कामे हाती घ्या. स्वतंत्र विचार करण्यावर अधिक भर द्या. कौटुंबिक प्रश्न प्राधान्याने हाताळा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *