![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ जून २०२६ ।।
मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope )
संताप आवरावा लागेल. काही कामांवर तुमच्या मनस्थितीचा परिणाम होऊ शकतो. व्यवहारात न्याय आणण्याचा प्रयत्न करावा. धार्मिक यात्रेचा बेत आखाल. प्रयत्नात कसूर करू नका.
वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
नवीन काम सुरुवात करताना सावध रहा. जबाबदारीची जाणीव ठेवाल. कामाचा भर वाढू शकतो. अति श्रमाने थकवा जाणवेल. जवळच्या प्रवासाचा आनंद घ्याल.
मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
दिवस मजेत घालवाल. मित्रांसोबत प्रवास कराल. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. घरात अधिक वेळ रमाल. भोजनात आवडीचे पदार्थ खाल.
कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
दिवस आपल्या आवडीप्रमाणे घालवाल. इतरांपेक्षा स्वत:च्या इच्छेला अधिक प्राधान्य द्याल. आवडत्या व्यक्तीची भेट होईल. झोपेची तक्रार जाणवेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल.
सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
मनाची चलबिचलता जाणवेल. फार विचार करण्यात वेळ वाया जाईल. आपली तांत्रिक बाजू भक्कम करावी. हातापायाला किरकोळ इजा संभवते. उगाचच काळजी करत बसून राहू नका.
कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
चांगला व्यावसायिक लाभ होईल. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल. क्षुल्लक गोष्टींवरून चिडचिड वाढू शकते. स्वकीयांचे गैरसमज दूर करावेत. नाहक खर्च होऊ शकतो.
तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
भावंडांशी संबंध सुधारतील. घराविषयी काही महत्त्वाच्या चर्चा होतील. अचानक धनलाभ संभवतो. नवीन कामाला चांगली सुरुवात होईल. कामाची गतीमानता वाढेल.
वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope )
अनाठायी खर्चाला आवर घालावी. कौटुंबिक वादावर नियंत्रण ठेवावे. जोडीदाराचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. क्षुल्लक गोष्टीवरून चिडू नका. मनात नकारात्मक विचार आणू नका.
धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मनात कसलाही गैरसमज आणू नका. कौटुंबिक वाद शांततेने हाताळा. कष्ट करूनच यश हातात पडेल. जमिनीच्या कामात अधिक लक्ष घालावे.
मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष द्या. जोडीदाराशी मनमोकळा प्रेमालाप कराल. भागीदाराशी संबंध सुधारतील. संपर्कातील लोकात वाढ होईल. जवळच्या लोकांच्या भेटी घेता येतील.
कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
नवीन कामातून समाधान लाभेल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. जवळचे नातेवाईक भेटतील. तुमच्या शब्दांना चांगली धार येईल. विचारपूर्वक बोलावे लागेल.
मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
दिवस चांगला जाईल. हातातील काम पूर्ण होईल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांचे सौख्य लाभेल.