Horoscope Today दि. ८ जुलै २०२६ ; आज मनातील इच्छेला मुरड घालून पहावी….………… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ जुलै २०२६ ।।

मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
कामाच्या स्वरुपात काहीसे बदल करायला हरकत नाही. नवीन ओळख बनवता येईल. गैरसमजुतीचे प्रसंग येऊ शकतात. प्रवासात काळजी घ्यावी. सामुदायिक वादात लक्ष घालू नका.

वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील. सतत खटपट करत राहाल. जवळच्या व्यक्तींच्या सहवासाची ओढ वाढेल. सर्वांशी जुळवून घ्यावे लागेल. आवडत्या गोष्टीत रमून जाल.

मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
कामात काही अनपेक्षित बदल दिसून येतील. उत्तम कार्यशक्ती लाभेल. दर्जा जपण्यासाठी धडपड कराल. ईर्षेने परिस्थितीवर मात कराल. संघर्षमय स्थितीपासून लांब राहावे.

कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
उपासनेत अधिक वेळ घालवावा. गैरसमजातून होणारी कटुता टाळा. आपले मत इतरांवर लादू नका. नियमित व्यायामावर भर द्यावा. शांत विचार करण्याची गरज भासेल.

सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
व्यक्तिमत्व विकासावर भर द्या. अंगीभूत कलागुणांचा विकास करता येईल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. जुन्या मित्रांच्या संपर्कात याल. सामाजिक कामात पुढाकार घ्याल.

कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
सामाजिक दर्जा सुधारता येईल. तुमचे अस्तित्व इतरांना दाखवून द्याल. अधिकार वाढीसाठी प्रयत्न कराल. महत्त्वाची सरकारी कामे पुढे सरकतील. गोड बोलून कामे साध्य करता येतील.

तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
आपल्या वागणुकीने आदर्श निर्माण कराल. मान टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहाल. राजकारणी धोरण आजमावून पहाल. आत्मबळाने वाटचाल करावी. पित्त विकाराचा त्रास जाणवेल.

वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
काही कामे उगाचच वेळ घेतील. क्षुल्लक अपयशाने खचून जाऊ नका. योग्य संधीची वाट पहावी लागेल. काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील. आत्मचिंतन करावे लागेल.

धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
जोडीदाराशी बोलताना मतभिन्नता वाढू शकते. त्याच्या मानी स्वभावाचा अचंबा वाटेल. नवीन लोक संपर्कात येतील. व्यवहारी दृष्टीकोन ठेवून वागावे लागेल. घरगुती कामात गुंतून पडाल.

मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
कामात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक गोष्टीत कौटुंबिक सहकार्य घ्यावे. मनातील इच्छेला मुरड घालून पहावी. अधिकारांचा योग्य ठिकाणी वापर करावा. कामाचा उरक वाढवावा लागेल.

कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
बौद्धिक दिमाख दाखवाल. उपासनेत प्रगती करता येईल. स्पर्धेत भाग घ्याल. एककल्ली विचार करू नका. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी.

मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
मन:शांति जपावी लागेल. फार चिडचिड करू नका. काही गोष्टी शांततेच्या मार्गाने सोडवाव्यात. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. शांत व संयमी विचार करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *