पुण्यात ‘हे’ आहेत कोरोनाचे 5 नवे हॉटस्पॉट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – २६ सप्टेंबर – कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे महानगरपालिके अंतर्गत असलेल्या वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पसरत चालला आहे. कोरोनाचा धोका दिवसागणित वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. हे 5 वॉर्ड कोरोनाचे हॉटस्पॉट होत असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर माहोल यांनी दिली आहे. सिंहगड रोड, वार्जे-कर्वेनगर, धनकवडी-सहकारनगर, हडपसर-मुढवा, अहमदनगर रोड-वडगाव शेरी या भागांचा त्यामध्ये समावेश आहे.

पुण्यात आज नव्यानं 1 हजार 621 लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं खऴबळ उडाली आहे. आतापर्यंत पुण्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 38 हजार 951 इतका झाला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पुणेकरांना एकीकडे यश मिळताना दिसत असलं तरी आता पुण्यातील या 5 भागांमध्ये नवे हॉटस्पॉट तयार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *