महाराष्ट्र 24 ऑनलाईन। विशेष प्रतिनिधी ।पिंपरी चिंचवड । दि.27 सप्टेंबर – सर्व्हे नंबर 233 गणेशनगर येथील झोपडपट्टीतील एसआरए योजनेअंतर्गत अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या नियोजित जागी नुकतेच भुमिपूजन करण्यात आले. सदर प्रकल्पाचे उद्घाटन पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
रोड वायन्डिंगमध्ये सुमारे 82 लोकांची घरे गेली. या लोकांना एसआरए प्रकल्पाअंतर्गत 450 चौरस फुटाचे पक्के घर मिळणार आहे. सर्व सोयीसुविधानियुक्त ही घरे असणार आहेत. यामध्ये लिफ्ट, बालवाडी, डिस्पेन्सरी, व भव्य 2 मजली पार्किंग आदी सुविधा देण्यात येणार आहेत.