![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ ऑगस्ट २०२६ ।।
मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. निसर्ग सौंदर्याबद्दल ओढ वाढेल. मन काहीसे विचलीत राहील. आत्मविश्वास कायम ठेवावा. सामाजिक भान राखून वागाल.
वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
व्यवसायात भागीदाराचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. अनावश्यक खर्च टाळावा. उत्साहवर्धक घटना घडतील. जोडीदाराशी प्रेमळ वार्तालाप कराल. मैत्रीचे संबंध सुधारण्यासाठी वाव मिळेल.
मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
कामाची धांदल वाढू शकते. काही अनपेक्षित बदल संभवतात. सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा लागेल. जोडीदाराला तुमच्या प्रती आदर वाटेल. अनावश्यक खर्च टाळावा.
कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
मुलांशी मतभेद संभवतात. व्यावसायिक प्रश्न प्राधान्याने सोडवावेत. मानसिक अस्थिरता टाळावी लागेल. आळस बाजूला सारून कार्यमग्न रहा. आवडते पुस्तक वाचाल.
सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. सकारात्मकतेने वावराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. हातापायास किरकोळ इजा संभवते. नवीन वस्तु खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल.
कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
खूप दिवसांनी जवळच्या मित्राची गाठ पडेल. जोडीदाराला प्रेमाने खुश कराल. तरुणांचे विचार जाणून घ्याल. कलाकारांना काही तरी नवीन करण्याची संधि मिळेल. केलेली धावपळ लाभदायक ठरेल.
तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
रागावर अंकुश ठेवावा. कामानिमित्त अचानक प्रवास करावा लागेल. प्रिय व्यक्तीच्या होकाराची मनात आस धराल. मन काहीसे विचलीत राहील. कामाच्या ठिकाणी विरोधाला सामोरे जावे लागू शकते.
वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
सारासार विचार करण्यावर भर द्यावा. आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. मुलांशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतात. कामाच्या ताणाचा परिणाम जाणवेल. जुने वाद मिटवावेत.
धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
प्रिय व्यक्तीच्या मनातील गैरसमज दूर कराल. दिवस काहीसा अनुकूल राहील. रखडलेली कामे मार्गी लावाल. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. बौद्धिक चकमक टाळावी.
मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
कामातील उत्साह कमी पडू देऊ नका. भावंडांची मदत मिळेल. मनावरील दडपण कमी होईल. घरात अधिकारवाणीने वावराल. तुमच्या लोकप्रियतेत वाढ होईल.
कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
अडचणीतून मार्ग काढता येईल. मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभेल. महिला वर्ग करमणुकीत रमेल. विरोधकांवर मात करता येईल. पित्त प्रकृतीत वाढ होऊ शकते.
मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
कटू बोलणे टाळा. एकतर्फी विचार करू नका. हितशत्रू पासून सावध रहा. उधारीचे व्यवहार टाळा. स्पर्धेत यश मिळेल.