Horoscope Today दि. ७ ऑगस्ट २०२६ ; आज बोलण्यावर ताबा ठेवावा..……… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ७ ऑगस्ट २०२६ ।।

मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope )
स्वत:मध्ये जाणीवपूर्वक बदल करावे लागतील. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. दिवस मनाप्रमाणे घालवावा. टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे. गरजूंना मदत कराल.

वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
मानसिक व्यग्रता जाणवेल. कौटुंबिक सौख्याचा विचार कराल. व्यावसायिक अडचण मिटवाल. चांगल्या कामाची योजना आखाल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल.

मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
आर्थिक व्यवहार पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी अनुकूल स्थिती राहील. घरातील ज्येष्ठांचे प्रोत्साहन मिळेल. अनावश्यक खर्च टाळावा. तुमचे मनोबल वाढीस लागेल.

कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
परिवारातील प्रश्न संवेदनशीलतेने सोडवावेत. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. कामाची दिवसभर धांदल राहील. कामाचा ताण नियोजनाने कमी करावा. आपलाच हेका खरा कराल.

सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात. शक्यतो हलका आहार घ्यावा. दिवसाचा उत्तरार्ध मौजमजेत घालवाल. प्रकाश झोतात याल.

कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
मित्रमंडळींचे सहकार्य घ्यावे लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. संयम ढळू देऊ नका. कौटुंबिक समस्येतून मार्ग निघेल. विशाल दृष्टीकोन बाळगावा.

तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
नातेवाईकांची मागणी पुरवाल. जोडीदाराचा खोटेपणा नाराजी वाढवू शकतो. आकांततांडव करू नका. स्पर्धेत यश मिळवाल. उत्पन्नाच्या नवीन संधी शोधाल.

वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
आर्थिक प्रश्न सोडवाल. काही प्रश्न गोडीने सोडवावेत. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. बोलण्यावर ताबा ठेवावा. वाहन चालवताना काळजी घ्या.

धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
आज कामातून चांगला लाभ होईल. वादाच्या मुद्यातून मार्ग काढाल. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. भौतिक सुखात वाढ होईल.

मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
व्यवसायातून चांगला लाभ होईल. लहानांशी मतभेदाची शक्यता. घराबाहेर वावरतांना सावध रहा. घरगुती कामात अधिक वेळ जाईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
मनाचा तोल सांभाळावा. योग्य संधीचा लाभ घ्यावा लागेल. उगाच बंधनात अडकू नका. वैचारिक धोरण बदलून पहावे. दिवस काहीसा धावपळीत जाईल.

मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
शक्यतो सौम्य प्रतिक्रिया द्या. वैवाहिक सौख्याला जास्त प्राधान्य द्या. व्यवसाय वाढीचा आनंद घ्याल. ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. क्षुल्लक कुरबुरींकडे दुर्लक्ष करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *