![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ ऑगस्ट २०२६ ।।
मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
घरगुती प्रश्न मिटतील. साधनेला चांगला काळ आहे. केवळ कामावर लक्ष केन्द्रित करावे. स्वत:वर ताबा ठेवावा. दिवस खेळीमेळीत जाईल.
वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
कामे जलद गतीने उरकण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक व्यवहार सावधानतेने करावा. चांगल्या गुंतवणुकीतून लाभाचे योग. व्यापारी वर्गाला दिवस लाभदायक असेल. खादी चांगली बातमी मिळेल.
मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
तरुण मंडळींनी फार उतावीळपणा करू नये. बदल स्वीकारावा लागेल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. वाहन विषयक अडचण मिटेल. हातात काही अधिकार येतील.
कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
पारदर्शी व्यवहार करावेत. भावंडांना सहाय्य करावे लागेल. आज एखादी आठवण जागृत होईल. विरोधक नामोहरम होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
अतिविचार करू नका. नवे मनसुबे यश देतील. बोलण्यातून आत्मविश्वास प्रकट कराल. आपल्या मताबद्दल आग्रही राहाल. मित्रांची उत्तम साथ लाभेल.
कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
कलाकार मंडळींना वेगळा दर्जा मिळेल. दिनक्रम व्यस्त राहील. झोपेची तक्रार जाणवेल. कागदपत्रे नीट जपून ठेवावीत. घराबाहेर सावधानतेने वावरावे.
तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
महिला वर्ग खुश राहील. मनातील प्रबळ इच्छा पूर्ण होईल. टीमवर्क उपयोगाला येईल. नवीन विचार जाणून घेता येतील. शुभ वार्ता मिळतील.
वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
कामात अधिक उत्साह वाटेल. कमिशनच्या कामातून चांगली कमाई कराल. दिवसाची सुरुवात व्यस्त राहील. लाभाच्या अनेक संधी चालून येतील. मनातील चिंता दूर होईल.
धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
खाण्या-पिण्याचे पथ्ये पाळावीत. निर्णय उत्स्फूर्तपणे घेतले तर फळाला येतील. ज्येष्ठांशी सुसंवाद साधावा. सहकार्यांशी वाद घालू नये. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.
मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
जुने व्यवहार लाभ देतील. काळाची पाऊले ओळखावीत. घरगुती वादविवादात अडकू नका. कामातील प्राधान्य जाणून घ्यावे. धार्मिक कामात मन रमवाल.
कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
जोडीदाराची प्रगती होईल. चर्चेतून नवकल्पना सुचतील. करमणूक प्रधान गोष्टी कराल. भेटवस्तू देताना खर्चाचा विचार कराल. सहकार्यांना सोबत कराल.
मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
उत्साहाने कार्यरत राहाल. दिवसाची सुरुवात धीम्यागतीने होईल. समस्यांचे निराकरण होईल. कौटुंबिक वादात पडू नका. स्वभावात उधळेपणा येईल.