महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३० सप्टेंबर – पुणे – पोको’चा नवीन स्मार्टफोन Poco M2 आजपासून ओपन सेलमध्ये खरेदी करता येणार आहे. ‘पोको इंडिया’ने या महिन्याच्या सुरूवातीलाच Poco M2 हा स्मार्टफोन भारतात लाँच केला. तेव्हापासून हा फोन फ्लॅश सेलमध्येच उपलब्ध होत होता. पण आता हा फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फ्लॅश सेलची वाट बघण्याची गरज नाही. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आज (दि.30) दुपारी 12 वाजेपासून हा फोन ओपन सेलमध्ये उपलब्ध होणार आहे.
ऑफर :
फ्लिपकार्टवरुन हा फोन ओपन सेलमध्ये खरेदी केल्यास काही आकर्षक ऑफरही आहे. यामध्ये ICICI Bank क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे ईएमआयवर स्मार्टफोन खरेदी केल्यास ७५० रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर ५ टक्के कॅशबॅकही मिळत आहे. तसेच, नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
Poco M2: स्पेसिफिकेशन्स :-
पोको एम2 मध्ये 6.53 इंच फुल एचडी+ (2340×1080 पिक्सेल) डिस्प्ले असून कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी80 प्रोसेसरचा सपोर्ट मिळेल. डुअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेल्या पोको एम2 हँडसेटमध्ये 6 जीबी रॅमसोबत 64 जीबी व 128 जीबी इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय मिळतो. फोटोग्राफीसाठी यामध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड, 5 मेगापिक्सेल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेंन्सरचा सेटअप आहे. तर, सेल्फीसाठी फोनमध्ये नाइट मोडसोबत 8 मेगापिक्सेलचा फ्रंट सेन्सर दिला आहे. याशिवाय फोनमध्ये फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी मिळेल. हा फोन अँड्रॉइड 10 बेस्ड मीयूआय 11 वर कार्यरत असून फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. यात मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सरही आहे.
किंमत :-
Poco M2 फोनच्या 6 जीबी रॅम व 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 10,999 रुपये आहे. तर, 6 जीबी रॅम व 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 12,499 रुपये आहे.