![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ ऑगस्ट २०२६ ।।
मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
कामातील उत्साह वाढीस लागेल. लहान-सहान गोष्टींवरून चिडू नका. बौद्धिक कामात अधिक कष्ट पडतील. घरातील गोष्टींबाबत अधिक दक्ष राहाल. आततायीपणे कोणतीही गोष्ट करू नका.
वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
सामाजिक गोष्टींची जाणीव मनात जागृत ठेवायला हवी. जवळचे मित्र भेटतील. कामाच्या ठिकाणी सुलभता लाभेल. धडाडीपणावर संयम ठेवा. चर्चेला अधिक महत्त्व द्या.
मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
गोड बोलण्यातून छाप पाडाल. कामातून अनपेक्षित लाभ मिळेल. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन कामाला निघावे. व्यापारी वर्गाला लाभ मिळतील. मित्रांशी सुसंवाद ठेवावा.
कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
व्यावसायिक स्तरावरील बदल लक्षात घ्या. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. कष्ट अधिक वाढू शकतात. व्यापार्यांनी अधिक मेहनत घ्यावी. कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्या.
सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
नवीन प्रयोगाला यश येईल. आपले मत अधिक स्पष्टपणे मांडाल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. वरिष्ठांना नाराज करू नका. त्यांचा दबदबा वाढेल.
कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
कष्टाला पर्याय नाही. झोपेची तक्रार जाणवेल. मन काहीसे विचलीत राहील. मनातील इच्छा अधिक तीव्र होईल. महत्त्वाच्या नोंदी ठेवाव्यात.
तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
नवीन विचार आत्मसात कराल. कलेला अधिक प्रोत्साहन मिळेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. मित्रांशी पैज लावाल.
वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
कौटुंबिक वातावरण चांगले राहील. वक्तव्य विचारपूर्वक करावे. तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल. विरोधक शांत राहतील. सरकारी कामे पुढे सरकतील.
धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
जवळचा प्रवास करता येईल. भावंडांची मदत मिळेल. रागाला आवर घालावी लागेल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. मनापासून जबाबदार्या पार पाडाल.
मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
दिवस शांततेत जाईल. विचारांना योग्य गती द्या. उत्साहवर्धक व सकारात्मक दिवस. आध्यात्मिक प्रगती कराल. जोडीदाराची योग्य साथ मिळेल.
कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
मनाची चंचलता जाणवेल. अचानक लाभाची शक्यता. हातातील कामात घाई करू नका. भौतिक सुखात वाढ होईल. स्थावरच्या व्यवहारातून लाभ होईल.
मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
मानसिक व्यग्रता जाणवेल. व्यावसायिक लाभावर लक्ष केन्द्रित करावे. अनाठायी खर्चाची शक्यता. प्रेमातील व्यक्तींनी आज सबुरी बाळगावी. राजकारणात पडू नका.
डिस्क्लेमर: वरील राशीभविष्य हे ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. यातील माहिती पूर्णपणे अचूक किंवा सत्य असल्याचा दावा केला जात नाही. महत्त्वाचे निर्णय घेताना संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.