स्वयंपाकघरात असणारी बहुगुणी लवंग ; कोरोना काळात होईल बराच फायदा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३ ऑक्टोबर – पुणे : लवंगामध्ये अँटीफंगल, अँटिबॅक्टेरिअल, अँटिसेप्टिक आणि एनाल्जेसिक गुणधर्म असतात. याव्यतिरिक्त लवंगामध्ये फॅटी अॅसिडस, तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्वे, ओमेगा -3 आणि खनिजंही असतात.लवंगामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. खाण्याव्यतिरिक्त लवंगाचा वापर मालिशसाठी देखील केला जातो ज्यामुळे हाडांचा त्रासही बरा होतो. लवंग चवीत तिखट असते. सर्दी-पडसेसारख्या समस्या असल्यास लवंग खूप प्रभावी आहे. बरेच लोक याचा वापर मुख्यत: चहामध्ये करतात. यामुळे फक्त चहाची चवच वाढत नाही तर सर्दी देखील बरी होते.

पोट साफ करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा
ज्यांचं पोट योग्यरित्या साफ होत नाही. त्यांनी रात्री झोपायच्या आधी 2 लवंगा चघळाव्यात. यामुळे पोट योग्य प्रकारे स्वच्छ होईल. लवंग रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचं कार्य करतं, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.

सौम्य तापावर फायदेशीर
सौम्य ताप असल्यास रात्री लवंगाच्या दुधाचं सेवन करून झोपा. सकाळी ताप पूर्णपणे बरा होईल.

खोकल्यामध्ये लवंगचा वापर कसा करावा
लवंगपूड आणि डाळिंबाची सालं किसून अर्धा चमचा मधातून दिवसातून 3 वेळा सेवन करा. यामुळे खोकला बरा होतो.

दातदुखीवर रामबाण उपाय
लवंगामध्ये युजेनॉल असतं. ज्यामुळे सायनस आणि दातदुखीसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. दातदुखी असेल तर लिंबाच्या रसात लवंगांची पूड मिसळा आणि जिथं वेदना होत आहेत, तिथं लावा. यामुळे वेदना कमी होतील तसंच इतर संसर्गाचा धोका कमी होईल.

पाठदुखीमध्ये मालिश करा
अंघोळीच्या अर्धा तास आधी लवंग तेलाने मालिश करावी. लवंग तेलाची मालिश केल्याने फक्त पाठदुखीच नाही तर इतर अवयवांच्या वेदना देखील नष्ट होतात.

तोंडाच्या अल्सरसाठी आयुर्वेदिक उपाय
तोंडात फोड आले असतील तर तव्यावर चांगले भाजलेल्या दोन लवंगा तोंडात ठेवा. लाळ आल्यावर ती थुंकत रहा. या उपायाने तोंडातील फोड बरे होतील.

डोकेदुखीवर उपाय
डोकेदुखी दूर करण्याकरता दोन लवंगा आणि एक चिमूटभर कापूर बारीक करून नारळाच्या तेलात मिसळा. या मिश्रणाने डोक्याला मालिश केल्यास डोकेदुखी कमी होईल.

नोट ; महाराष्ट्र २४ वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख ;प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला महाराष्ट्र २४ जबाबदार असणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *