Horoscope Today दि. १८ सप्टेंबर २०२६ ; आज निराशाजनक विचार करू नका………..……… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ सप्टेंबर २०२६ ।।

मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
आपल्या तत्ववादी स्वभावाला मुराद घालावी लागेल. नवीन वाचन वा लिखाण चालू करावे. कुटुंबासोबत दिवस चांगला जाईल. फिरायला जाण्याची संधि मिळेल. नवीन ओळख होईल.

वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. खाण्या-पिण्याची रेलचेल होईल. व्यापार्‍यांनी आळस दूर सारावा. केवळ कामावर लक्ष केंद्रीत करावे. सामाजिक कामात सहभागी होता येईल.

मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. मित्रांशी सलोख्याने वागावे. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. निराशाजनक विचार करू नका. जमिनीतील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आर्थिक बाजू संतुलित ठेवावी.

कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
गरज नसताना आक्रमक होऊ नका. बौद्धिक कौशल्य दाखवा. घरातून काम करण्याची संधी चालून येऊ शकते. नवीन प्रस्तावांकडे लक्ष ठेवावे. भेटवस्तू मिळण्याची शक्यता.

सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
मुलांचे प्रेम वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उत्साहाने कार्यरत राहावे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
बोलण्यातून लोकसंग्रह वाढवाल. घरातील लोकांशी सल्लामसलत करावी. सहकार्‍यांचे उत्तम सहकार्य लाभेल. रचनात्मक कामे करावीत. पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा.

तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
जुनी कामे पूर्ण करण्याचा ध्यास घ्या. छोटे प्रवास घडतील. वैयक्तिक समस्या सोडवता येतील. कौटुंबिक जबाबदारी पूर्ण कराल. तुमच्या भोवती संशयाचे जाळे निर्माण होऊ शकते.

वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
मनाची चलबिचलता जाणवेल. नवीन गोष्टी शिकण्यावर भर द्या. तरूणांशी मैत्री वाढेल. क्षुल्लक मानसिक समस्या जाणवू शकतात. संयमाने परिस्थिती हाताळा.

धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
तुमच्या कलागुणांचे कौतुक होईल. मानसिक शांतता लाभेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मदत करताना ऊर्जा वाया घालवू नका. टीकेकडे लक्ष देऊ नका.

मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
व्यापारासाठी योग्य काळ. कामाचा उरक वाढेल. व्यापारी वर्ग खुश राहील. अधिकारी तुमचे कौतुक करतील. दिनक्रम व्यस्त राहील.

कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
नवीन गोष्टी शिकाल. भावनेला आवर घालावी. भावंडांची बाजू समजून घ्यावी. गोष्ट अधिक प्रमाणात ताणू नये. मनाचा आवाज ऐकावा.

मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
घाईघाईने निर्णय घेऊ नका. अचानक धनलाभाची शक्यता. योग्य जागी गुंतवणूक कराल. शेअर्स मध्ये लाभ संभवतो. कृतीतून वाद उत्पन्न होऊ देऊ नका.

डिस्क्लेमर: वरील राशीभविष्य हे ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. यातील माहिती पूर्णपणे अचूक किंवा सत्य असल्याचा दावा केला जात नाही. महत्त्वाचे निर्णय घेताना संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *