Horoscope Today दि. ०१ ऑक्टोबर ; आज खर्चात वाढ होण्याची शक्यता…………..……… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०१ ऑक्टोबर २०२६ ।।

मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
आत्मविश्वास बाळगून काम करा. नातेवाईकांशी व्यवहाराने वागा. आज दिनक्रम व्यस्त राहील. मनाचा तोल सांभाळावा. समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून जाईल.

वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
इतरांकडून स्तुति केली जाईल. सतत काम करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगा. ग्रहमानाची साथ मिळेल. आजचा दिवस शुभ राहील. धनसंचय वाढीस लागेल

मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope)
वागणे आणि बोलणे यांचा मेळ साधावा. दिवस धावपळीत जाईल. मात्र नियोजित काम पूर्ण होईल असे नाही. प्रवास संभवतो. खर्चात वाढ होण्याची शक्यता.

कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे. घरातील कामात अडकून पडाल. रचनात्मक कामात आनंद मिळेल. व्यक्तिमत्व विकास वृद्धिंगत होईल. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल.

सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
आपल्या चांगुलपणाला तडा जाऊ देऊ नका. मनातील इच्छेला अधिक महत्व द्यावे. कार्यक्षेत्रात उत्तम कामकाज कराल. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. प्रामाणिकपणे काम करण्यावर भर द्याल.

कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
आळस बाजूला सारावा लागेल. आपल्यातील कला जोपासा. कामाचा अधिक ताण जाणवेल. धार्मिक गोष्टीत आनंदाची अनुभूति घ्याल

तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
हातातील काम मनापासून करावे. कामातून चांगले समाधान मिळेल. आपण घेत असलेल्या मेहनतीला योग्य फळ मिळेल. आनंदाची अनुभूति घ्याल. मित्राचा सल्ला मोलाचा ठरेल.

वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
आहारातील पथ्य पाळा. अंत:करणापासून समोरच्याला मदत करा. प्रेम संबंधातील ओलावा वाढेल. नातेवाईक मदतीला येतील. जुने मित्र बरेच दिवसांनी भेटण्याचा योग.

धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
आज आखलेले काम सुरळीत पार पडेल. जास्त काळजी करू नये. स्पर्धा परीक्षेसंदर्भात सकारात्मक वार्ता मिळेल. मित्राने दिलेली शुभ वार्ता मन प्रसन्न करेल. समस्येचे निराकरण होईल.

मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
उगाचच कोणाची खोडी काढू नका. कामाचा व्याप वाढता राहील. जवळचा प्रवास करावा लागेल. कामाच्या बाबतीत गाफिल राहू नका. विस्कळीत कामाची घडी नीट बसवावी.

कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
फसव्या लोकांपासून सावध रहा. स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घ्या. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. मित्राची योग्य साथ लाभेल. विरोधक पराभूत होतील.

मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
व्यावसायिक प्रगती साधता येईल. मनोकामना पूर्ण करणारा दिवस. अति तिखट पदार्थ खाणे टाळावे. धार्मिक कामातील गोडी वाढेल. कुटुंबासाठी देखील वेळ काढावा.

डिस्क्लेमर: वरील राशीभविष्य हे ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. यातील माहिती पूर्णपणे अचूक किंवा सत्य असल्याचा दावा केला जात नाही. महत्त्वाचे निर्णय घेताना संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *