Horoscope Today दि. १४ ऑक्टोबर ; आज उद्योगाची स्थिती सुधारेल…………… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑक्टोबर २०२६ ।।

मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
जोडीदाराच्या सहकार्याने काम पूर्ण कराल. घरातील मोठ्या कामाला गती येईल. मुलांची कृती मनाला लागू शकते. इच्छा नसताना एखादे काम करावे लागेल. मन विचलीत होऊ शकते.

वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
विकतची दुखणी घेऊ नका. विचार करून निर्णय घ्या. वरिष्ठ अधिकार्‍यांचे सहकार्य लाभेल. उगाच नसते विचार करू नका. ज्येष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल.

मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope)
इतरांचा विश्वास संपादन करावा. दिवसाची सुरुवात उत्तम होईल. प्रयत्नात कसूर करू नका. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल. सावधगिरी बाळगून कामे करावीत.

कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
छानशौकीपणावर खर्च कराल. खर्चावर ताबा ठेवावा. संयम आणि धिराने परिस्थिती हाताळा. दिवसाची सुरुवात मध्यम फलदायी असेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
लोकांना योग्य सल्ला द्याल. जबाबदारीने काम कराल. उद्योगाची स्थिती सुधारेल. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळेल. हितशत्रू माघार घेतील.

कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
आक्रमकतेने बोलू नका. व्यापारी क्षेत्रात प्रगती कराल. आपल्या स्वभावाचा लोक गैरफायदा घेऊ शकतात. मदतीचा हात पुढे कराल. मित्रांचे सहकार्य लाभेल.

तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
भागीदारीत सबुरीने घ्यावे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको. स्पर्धा परीक्षेची तयारी कराल. हिशोबात चोख राहाल. अनेक दिवस वाट पाहत असलेल्या व्यक्तीची गाठ पडेल.

वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नका. मित्रांचा सल्ला ऐकावा. मेहनतीचे कौतुक केले जाईल. कामावर लक्ष केन्द्रित करणे गरजेचे. एकूणच आजचा दिवस संमिश्र राहील.

धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. मनातील अनामिक भीती दूर होईल. दुपारनंतर धावपळ करावी लागेल. नवीन ओळख मैत्रीत बदलेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
विचारांना चांगली दिशा द्याल. मनात नवीन कल्पना रुजतील. कामे विलंबाने सुरू करू नका. चिकाटी व संयम कायम ठेवा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
मनातील संभ्रम दूर करावा. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल. पित्त प्रकृतीत वाढ होऊ शकते. अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळू शकते.

मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
कौटुंबिक समतोल साधावा. भागीदारीच्या कामात अधिक वेळ द्यावा. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. जुने कामे आधी पूर्णत्वास न्या. मन विचलीत होणार नाही याची दक्षता घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *