Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
शोषित, दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला – उद्धव ठाकरे - Maharashtra 24

शोषित, दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला – उद्धव ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. ९ ऑक्टो. – मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे आज निधन झाले या दुखःद घटनेवर ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवानजी यांच्या निधनाने दुःख झाले. सर्वसामान्य जनतेशी राजकारणात प्रदीर्घ अनुभव असलेल्या पासवानजी यांची नाळ जोडलेली होती. त्यांच्या निधनाने शोषित, दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला आहे. रामविलास पासवान यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून रूग्णालयात उपचार सुरु होते. शिवाय त्यांची शनिवारी हृदयाची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पण आज उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *