महाराष्ट्र २४ ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. ९ ऑक्टो. – नवीदिल्ली – हिंदुस्थानातील कोरोनाविरोधातील लढा हा लोकांनी चालवला आहे आणि त्याला कोविड कॉरियर्सकडून मोठे सामर्थ प्राप्त होतंय. कोरोना विरोधातील लढाई एकजूट होऊन लढू, लस मिळेपर्यंत काळजी घ्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.कोरोनाविरुद्ध बचावासाठी पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारपासून एका ‘जन आंदोलना’ची सुरूवात केली. दिवाळी, दसरा यासारखे सण तसेच हिवाळी हंगाच्या पार्श्वभूमीवर कोरोनापासून बचावासाठी विशेष काळजी घेण्याच आवाहन पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरद्वारे केलं आहे.
कोरोना विरोधातील लढा एकत्रित लढू, नेहमी लक्षात ठेवा मास्कचा वापर करा. हात स्वच्छ धुवावे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. दो गज की दूरी ठेवा. आपण एकत्रित आलो तर यशस्वी होवू. ओषध नाही तोपर्यंत निष्काळजीपणा नको, असं त्यांनी म्हटल आहे.हिंदुस्थानात कोरोना विरोधातील लढाई जनतेद्वारे लढली जातेय. कोविड योध्यांना या लढाईनं मोठी ताकद मिळतेय, असंही त्यांनी म्हटलं आहे.