ही बँक देणार FD वर मिळेल 7 टक्के व्याज,13 महिन्यांचा आहे मॅच्यूरिटी पीरिएड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – दि. ११ ऑक्टो . – पुणे – फिक्स्ड डिपॉझिट हा भारतातील सर्वात लोकप्रिय आणि सोपा बचतीचा पर्याय आहे. आज विविध पर्याय उपलब्ध असून देखील सामान्य नागरिकांचा सर्वाधिक विश्वास एफडीवरच आहे. दरम्यान लॉकडाऊन काळात अनेक बँकांचे एफडी रेट्स कमी झाले आहेत. SBI, ICICI, HDFC या देशातील महत्त्वाच्या बँकांसह अनेक बँकांनी एफडी रेटमध्ये कपात केली आहे. अशावेळी गुंतवणूकदार एखादा नवीन पर्याय शोधत आहेत. तर या काळात पेटीएम पेमेंट्स बँक (Paytm Payments Bank) मध्ये एफडी बनवणे फायद्याचे ठरू शकते. पेटीएमच्या या एफडीमध्ये मॅच्युरिटी पीरिएड 13 महिन्यांचा आहे आणि विशेष म्हणजे यावर 7 टक्के व्याज मिळते.

पेमेंट्स बँकांना अशाप्रकारे एफडीची सुविधा प्रदान करण्याची परवानगी नाही आहे. त्यामुळे पेटीएम पेमेंट्स बँकेने याकरता इंडसइंड बँकेशी पार्टनरशीप केली आहे. दरम्यान व्याजदर इंडसइंड बँकेकडून निश्चित केले जातात.

फक्त 13 महिन्यांचा मॅच्यूरिटी पीरिएड
पेटीएम पेमेंट बँकेच्या एफडीमध्ये मॅच्युरिटी पीरिएड 13 महिन्यांचा आहे आणि विशेष म्हणजे यावर 7 टक्के व्याज मिळते. या एफडीमधील विशेष बाब म्हणजे मॅच्यूरिटी पीरिएडआधी जरी एफडी तोडली तरी कोणतेही चार्जेस द्यावे लागत नाहीत.

काही अन्य बँकांचे एफडीवरील व्याजदर

-एयू स्मॉल फायनान्स बँक तुम्हाला एफडीवर 7 टक्के दराने व्याज देईल
-डीसीबी बँकेत 6.95 टक्के दराने व्याज मिळते आहे. या बँकेत 1.5 लाख रुपयाची गुंतवणूक 5 वर्षात 2,11,696 रुपये होईल
-आयडीएफसी बँकेत 6.75 टक्के व्याज मिळते आहे. या बँकेत 1.5 लाख रुपयाची गुंतवणूक 5 वर्षात 2,09,625 रुपये होईल
-येस बँकेत एफडीवरील व्याजदर 6.25 टक्के आहे.
-Deutsche Bank आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक 5 वर्षांच्या एफडीवर 6.25 टक्के दराने व्याज देत आहेत. 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 5
वर्षांनी ही रक्कम वाढून 2,02,028 होईल.
-बंधन बँक आणि करूर वैश्य बँक 5 वर्षांच्या एफडीवर 6 टक्के व्याज देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *