जानेवारीत होणार ऑनलाइन विश्व मराठी संमेलन,

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – दि. ११ ऑक्टो . – मुंबई – विश्व मराठी परिषदेचे विश्व मराठी संमेलन 28 ते 31 जानेवारी 2020 दरम्यान ऑनलाईन होणार आहे. शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे महासंमेलनाध्यक्ष आहेत. सुमित्रा महाजन या संमेलनाच्या महास्वागताध्यक्ष असून बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिकाच्या अध्यक्ष विद्या जोशी संमेलनाच्या महासंरक्षक असतील.

संमेलनामध्ये चर्चा, परिसंवाद, कविकट्टा, कथा कट्टा, संस्पृती कट्टा, आयडिया कट्टा – कल्पनांचे सादरीकरण, वडिलधाऱयांसाठी मनोगत कट्टा – सांगेन गोष्टी युक्तिच्या चार, वैश्विक प्रतिभा संगम, उपयुक्त माहितीची देवाणघेवाण असे विविध उपक्रम सादर होणार आहेत. तसेच एक दिवस स्वतंत्र विश्व मराठी युवा संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

देश, विदेशातील मराठी बांधवांनी संमेलनासाठी प्रतिनिधी म्हणून निःशुल्क नोंदणी करण्यासाठी www.sammelan.vmparishad.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन विश्व मराठी परिषदेने केले आहे. संमेलनासाठी 25 देशांमधून 25 स्वागताध्यक्ष असून लीना सोहनी या हिंदुस्थानातील स्वागताध्यक्ष आहेत.

हिंदुस्थानाच्या 12 राज्यांतील, जगभरातील 32 देशांतून, अमेरिकेच्या 40 राज्यांतील, आणि 150 हून अधिक संस्था, 500 हून अधिक वाचनालये आणि 1000 हून अधिक महविद्यालयांचा सहभाग.

संमेलनामध्ये नऊ जणांचे अध्यक्षीय मंडळ

डॉ. अनिल काकोडकर हे महासंमेलनाध्यक्ष असून साहित्य विभाग – भारत सासणे आणि डॉ. विनता पुलकर्णी, शिकागो, – संस्पृती विभाग – सयाजी शिंदे आणि रश्मी गावंडे, फ्रँकफर्ट, उद्योजक विभाग – डॉ. प्रमोद चौधरी आणि मृणाल कुलकर्णी, लंडन, युवा विभाग – उमेश झिरपे आणि अजित रानडे जर्मनी हे संमेलनाध्यक्ष असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *