महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – दि. ११ ऑक्टो . – पुणे -महाराष्ट्रात कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने आता कोरोनामुक्तीमध्ये आघाडी घेतली आहे. २ आठवड्यापासून नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
शनिवारी (10 ऑक्टोबर) दिवसभरात 703 नवे रूग्ण आढळून आलेत. तर दिवसभरात 1117 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
पुण्यात 47 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला त्यात 25 रूग्ण पुण्याबाहेरचे आहेत.
शहरात सध्या 703 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 437 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 53 हजार 600 एवढी झाली आहे.
पुण्यात सध्या 13 हजार 300 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुण्यात आत्तापर्यंत एकूण 3808 रुग्णांचा मृत्यू झालाय.
आजपर्यंतच एकूण 1 लाख 36 हजार 492 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.