महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता, हवामान विभागाची माहिती

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – दि. ११ ऑक्टो . – मुंबई -: हवामान खात्याने महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक खोलवर गेल्याने संपूर्ण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ तसेच कोकणात बर्‍याचशा ठिकाणी येत्या चार-पाच दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भूते यांनी ही माहिती दिली.

तसेच येणार्‍या आठवड्यात (११ ते १७ ऑक्टोबर) महाराष्ट्रात कोकणासह आतल्या भागात पाऊस पूर्णत: सक्रिय राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ढगांच्या गडगडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापणीला आलेल्या पिकांवरती दाट प्रभाव होण्याची शक्यता आहे, असा इशारा मुंबईच्या हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *